riteish deshmukh  sakal
Premier

Riteish Deshmukh: 'बिग बॉस मराठी ५' मध्ये कुणाला पाहायला आवडेल? रितेश देशमुखने घेतली 'या' टॉप अभिनेत्यांची नावं

Riteish Deshmukh On Bigg Boss Marathi 5: उत्साह हा नेहमीच नवीन ऊर्जा देतो असं म्हणत आता रितेश देशमुख 'बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन करायला तयार झाला आहे.

Santosh Bhingarde

हिंदी चित्रपटांबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आता छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. कलर्स मराठीवरील ‘बिग बाॅस मराठी’ या कार्यक्रमाचा तो सूत्रसंचालक आहे. यापूर्वी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करत होते. आता रितेश देशमुखकडे ही जबाबदारी आली आहे. त्यानिमित्त रितेशशी केलेली खास बातचीत...

तू एक अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेस. त्यानंतर दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही नाव कमावलेस. आता छोट्या पडद्यावर होस्ट म्हणून लोकांच्या भेटीला येत आहेस. अशा वेगवेगळ्या गोष्टी करताना तुझ्या मनात नेमक्या भावना काय असतात?

माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट एक नवीन उत्साह घेऊन येते. अभिनय करताना एक उत्साह होता. निर्मिती आणि दिग्दर्शन करतानासुद्धा एक उत्साह होता. आपल्याला नेहमी उत्साहच ऊर्जा देत असतो आणि तीच ऊर्जा आपल्याला पुढे चालण्यासाठी प्रोत्साहन देते. त्यामुळे नेहमीच मला काहीतरी नवीन काम करायला आवडते आणि त्या कामातूनच एक वेगळा उत्साह आणि आनंद मिळतो.

बिग बॉस हा कार्यक्रम खूप लोकप्रिय आहे. मराठीमध्ये यापूर्वी आलेल्या सगळ्या सीझन्सना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. तुला नेमका हाच कार्यक्रम करावा, असे का वाटले?

मला हा फॉर्मेट प्रचंड आवडतो. मी बिग बॉस या शोचा खूप मोठा चाहता आहे. यापूर्वी हा शो मी पाहिलेला आहे. सलमान भाई तसेच महेश सर यांना सूत्रसंचालन करताना मी पाहिले आहे. एक होस्ट म्हणून तुमचे स्पर्धकांशी एक नातं जुळतं. ते मी नेहमी दुसऱ्यांना करताना पाहिले आहे. यामध्ये एक वेगळी मजा आहे आणि ती मजा आता मला एक्सप्लोर करायची आहे.

अभिनय करताना आपल्याकडे एक स्क्रीप्ट असते आणि सूत्रसंचालन करताना आपल्याला स्क्रीप्ट दिली जात नाही, तर त्या गोष्टी तू कसा करणार आहेस?

या सर्व गोष्टी परिस्थितीवर अवलंबून असतात. या कार्यक्रमातील स्पर्धक आहेत ना ते कोण कसे वागेल, कुणावर आवाज चढवायचा आहे आणि कुणाला समजवायचे आहे. जशी परिस्थिती निर्माण होईल, तसे मी वागेन. या सगळ्या गोष्टी त्या-त्या वेळी घडणार आहेत. आता स्पर्धक कोण आहेत, हे मला माहिती नाही.

लमान खानने हिंदी बिग बाॅसचे सूत्रसंचालन केले. अनिल कपूर ओटीटीवरील बिग बाॅसचे सूत्रसंचालन करत आहेत. महेश मांजरेकर यांनी मराठी बिग बाॅसचे यशस्वी सूत्रसंचालन केले. या प्रत्येकाची स्टाईल वेगळी होती आणि त्यांचा चाहतावर्गही वेगळा होता. आता यामध्ये तू नेमके काय करणार आहेस?

मी या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे आणि मी माझ्या पद्धतीने सूत्रसंचालन करणार आहे. माझी स्टाईल निराळी असणार आहे आणि त्याच स्टाईलने काम करणार आहे.

मराठीमध्ये असे कोणते कलाकार आहेत ज्यांना तुला या बिग बाॅसमध्ये पाहायला अधिक आवडेल?

जितेंद्र जोशी आणि सिद्धार्थ जाधव. हे दोन्ही कलाकार या बिग बाॅसच्या घरात आले, तर ते मला नक्कीच आवडेल. कारण ते आले तर बिग बाॅसच्या घरात कल्ला अधिक होईल.

बिग बाॅसमधील स्पर्धकांना चांगले स्टारडम प्राप्त झालेले आहे. तू यातील एखाद्या स्पर्धकाला तुझ्या प्राॅडक्शन हाऊसमधून चित्रपटामध्ये संधी देणार का?

आम्ही असे काही ठरवत नाही. एखादा कलाकार बिग बाॅसमधून आला आहे म्हणून त्याला संधी द्यावी, असा आमच्या कंपनीचा निकष नाही. आम्ही त्याचे टॅलेंट पाहतो. त्याचे फॅन्स फाॅलोईंग किती आहे आणि आम्ही ज्या भूमिकेसाठी त्याची निवड करणार आहोत, त्यासाठी तो योग्य आहे का, ते पाहतो आणि मगच त्याला घेतो.

सन २००३ मध्ये तुझा पहिला चित्रपट आला होता. आता त्याला दोन दशकांहून अधिक काळ लोटलेला आहे. आजही तू तुझे स्टारडम टिकवून ठेवले आहेस. हे तुला कसे काय जमले?

मी आतापर्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे आणि त्यामुळेच मला मिळालेले यश मी टिकवून ठेवले आहे. विशेष बाब म्हणजे माझ्या चाहत्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. माझ्या कलाकृतीला त्यांनी नेहमीच उत्तम प्रतिसाद दिला. त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच माझ्या मागे राहिला. त्यामुळे मी हे यश टिकवून ठेवू शकलो. मी माझ्या चाहत्यांचा त्याबाबत आभारी आहे. आतापर्यंत त्यांनी जे प्रेम मला दिले तेच प्रेम यापुढेही मला मिळेल, अशी आशा आहे.

तुझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये तुला कधी कधी अपयशालादेखील सामोरे जावे लागले आहे. त्यावेळी तुझ्या मनातील भावना काय असतात?

यशाबरोबरच अपयशदेखील मी जवळून पाहिले आहे; पण त्याला कधी घाबरलो नाही किंवा भीतीने हे क्षेत्र कधी सोडले नाही. अपयशातून नवीन काही तरी शिकत गेलो. कारण अपयश हे आपल्याला काही तरी धडा शिकवते. तो धडा घेऊनच आपण पुढील वाटचाल जोमाने करायची असते.

तुझ्या ‘वेड’ या चित्रपटाला घवघवीत यश मिळाले. मागील वर्षी आलेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटानेही बाॅक्स आॅफसवर उत्तम कामगिरी केली. यावर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये तीन-चार चित्रपट वगळता अन्य कोणत्याही चित्रपटाला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. याबाबतीत तू काय सांगशील?

मराठीमध्ये चांगले चित्रपट बनत आहेत; परंतु त्यातील काही चित्रपट प्रेक्षकांना आवडत आहेत तर काही नाही आवडत. कोणता चित्रपट प्रेक्षकांना आवडेल आणि कोणता नाही हे काही सांगू शकत नाही. कधी कधी चांगले चित्रपटदेखील चालत नाहीत, याचे दुःख होते; तरीही मला असे वाटते की मराठीमध्ये स्क्रीप्टवर अधिक चांगले काम होणे आवश्यक आहे. मराठी प्रेक्षकांचा अभिरुची पाहून स्क्रीप्टवर अधिकाधिक काम करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT