genelia deshmukh  esakal
Premier

जिनिलियाला पहिल्यांदा भेटल्यावर काय होती विलासराव देशमुखांची प्रतिक्रिया? रितेशने सांगितला तो किस्सा

Genelia Deshmukh Vilasrao Deshmukh First Meet: लोकप्रिय मराठी अभिनेता रितेश देशमुख याने एका मुलाखतीत जिनिलिया आणि विलासराव देशमुख यांच्या भेटीबद्दल सांगितलं होतं.

Payal Naik

Riteish Deshmukh On Genelia Deshmukh: लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिने 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना भावाला. 'जाने तू या जाने ना' या चित्रपटाने तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. तिने आपल्या गोड हास्याने प्रेक्षकांना आपलंसं केलं. प्रेक्षकांची लाडकी जिनिलिया नंतर देशमुखांची सून झाली. रितेश देशमुख आणि जिनिलिया अख्ख्या महाराष्ट्राचे दादा वहिनी झाले. त्यांचा 'वेड' हा चित्रपट प्रचंड गाजला. मात्र जिनिलिया आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची पहिली भेट कशी झालेली तुम्हाला ठाऊक आहे का? रितेशने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं.

'वेड' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत रितेशने जिनिलिया आणि त्याचे वडील विलासराव देशमुख यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं होतं. रितेश म्हणाला, 'एकदा जिनिलिया घरी आल्या होत्या. त्या आईला भेटायला घरी यायच्या पण त्यांची पप्पांसोबत कधीही भेट झाली नव्हती. आईला आमच्याबद्दल अंदाज आलेला कारण माझी कोणतीच मैत्रीण कधी घरी येत नव्हती. एकेदिवशी त्या आल्या त्या दिवशी पप्पा घरच्या गार्डनमध्ये एक मिटिंग करत होते. ती आली आणि तिचा स्वभाव एकदम उथळ असल्याने तिने जाता जाता पप्पांकडे पाहिलं त्यांना म्हणाली हाय पप्पा आणि पुढे आली. त्यावर माझे वडील शांत उभे होते. त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यांनी फक्त मान हलवली.'

रितेश पुढे म्हणाला, ' त्यांनाही प्रश्न पडला असेल कदाचित काय मुलगी आहे ही. त्यांची पहिली भेट अशी झाली असली तरी त्यांचा जिनिलियावर खूप जीव होता. ते तिला मुलगी मानायचे. तिचा हाच स्वभाव त्यांना आवडायचा.' रितेश आणि जिनिलिया यांच्या लग्नानंतर काही महिन्यातच विलासरावांचं निधन झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT