Shweta Shinde sakal
Premier

Marathi Actress: अभिनेत्रीच्या साताऱ्यातील घरावर दरोडा; चोरांनी लंपास केले इतके तोळे सोनं

चोरांनी श्वेताच्या घरावर दरोडा टाकल्यानंतर सोनं आणि पैसे चोरल्याची माहिती मिळत आहे.

priyanka kulkarni

Shweta Shinde: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता शिंदे (Shweta Shinde) ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. श्वेताच्या साताऱ्यातील (Satara) घरावर दरोडा पडला आहे. ही घटना 3 जून रोजी घडली आहे. चोरांनी श्वेताच्या घरावर दरोडा टाकल्यानंतर सोनं आणि पैसे चोरल्याची माहिती मिळत आहे.

साताऱ्यातील घरावर दरोडा

मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मराठी मालिकाविश्वातील आघाडीची निर्माती श्वेता शिंदे हिच्या साताऱ्यातील घरावर दरोडा पडला आहे. काही चोरांनी श्वेताच्या घरावर दरोडा टाकून तिच्या घरातील 10 तोळे सोनं आणि काही पैसे चोरले आहेत, अशी माहिती मिळत आहे. या प्रकरणी श्वेतानं पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

श्वेता शिंदे ही तिच्या आईसोबत साताऱ्यातील पिरवाडी येथे राहते. ती कामानिमित्त मुंबईत आली होती. तेव्हा काही चोरांनी तिच्या घरावर दरोडा टाकला, असं म्हटलं जात आहे.

जाणून घ्या श्वेता शिंदेबाबत...

श्वेता शिंदेनं अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. श्वेता ही अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही काम करते. श्वेतानं 'लागीर झालं जी', अप्पी आमची कलेक्टर या मालिकांची निर्मिती केली आहे. सध्या श्वेताच्या लाखाचा एक आमचा दादा या आगामी मालिकेची चर्चा होत आहे. श्वेताच्या या मालिकेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या मालिकेत नितीश चव्हाण हा प्रमुख भूमिकेत आहेत. श्वेतानं डॉक्टर डॉन, उंच माझा झोका या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच तिनं आई नंबर 1 आणि आभास या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT