rubina dilaik  esakal
Premier

नवरात्रीच्या मुहूर्तावर रुबीना दिलैकने दाखवला जुळ्या मुलींचा चेहरा; वडिलांसोबत खेळणाऱ्या चिमुकल्यांना पाहून नेटकरी म्हणाले-

Rubina Dilaik Abhinav Shukla Reveals Their Twin Daughters Faces: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबीना दिलैक आणि अभिनेता अभिनव शुक्ला यांनी अखेर त्यांच्या जुळ्या मुलींचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे.

Payal Naik

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबीना दिलैक आणि अभिनेता अभिनव शुक्ला यांची जोडी चाहत्यांची प्रचंड आवडती आहे. त्यांची लव्हस्टोरी देखील अगदीच वेगळी आहे. रुबीना आणि अभिनव यांनी लग्नानंतर वेगळं व्हायचा निर्णय घेतला होता. मात्र ते दोघेही एकत्र बिग बॉस मध्ये गेले आणि त्यांची आपल्या नात्याला पुन्हा एक संधी देण्याचा विचार केला. आता ते पुन्हा एकत्र आले आहेत. लग्नाच्या अनेक वर्षानंतर रुबीना आणि अभिनव आईबाबा झाले होते. अभिनेत्रीने गेल्या वर्षी जुळ्या मुलींना जन्म दिला होता. आता अखेर त्यांच्या जन्माच्या ११ महिन्यांनी त्यांनी आपल्या लाडक्या लेकीचं चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. मुलींचा गोंडस चेहरा पाहून नेटकरी त्यांच्या प्रेमात पडले आहेत.

रुबिनाने नोव्हेंबर २०२३ मध्ये मुलींना जन्म दिला होता. आता या नवरात्रीच्या मुहूर्तावर तिने आपल्या लेकीचं चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. एधा आणि जीवा या तिच्या मुलींना पाहून चाहते त्यांच्यावर फिदा झाले आहेत. त्यांच्या साधेपणाने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. एधा आणि जीवा यांच्या कपाळावर काळ्या रंगाची टिकली आहे. तर डोक्यावर हेअरबॅन्ड आहे. काही फोटोंमध्ये त्या रुबीनासोबत दिसत आहेत तर काही फोटोंमध्ये त्या अभिनवसोबत दिसत आहेत. त्यांचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिलं, 'नवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर एधा आणि जीवा यांच्याशी भेट करून देतेय. संयम बाळगून आमची वाट पाहिल्याबद्दल सगळ्यांचे आभार.

रुबीनाची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होतेय. यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्यावर लाइकचा वर्षाव केला आहे. तर नेटकऱ्यांसोबतच अनेक कलाकारांनीही त्यांच्या फोटोवर कमेंट केल्या आहेत. भारती सिंहने प्रतिक्रिया देत लिहिलं, 'जय माता दि' तर लवकरच आई होणार असलेल्या दृष्टी धामी हिने लिहिलं, 'खूप गोड आहेत.' डोक्यावर काली टिकली आणि हातात चांदीचा कडा घातलेल्या रुबीनाच्या मुलींनी सगळ्यांचं मन जिंकलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी राष्ट्रीय संयोजक! कॉकरोच जनता पार्टीवर दावा करत निवडणूक आयोगाकडे वकिलाचा अर्ज; CJPचा लोगोही वापरला

Ranveer singh controversy: 45 कोटींचं नुकसान? Don 3 मधून अचानक बाहेर पडला रणवीर? काय घडलं?

"मी दुनियादारी 2 करणार नाही" अखेर संजय जाधव स्पष्टच बोलले; "कदाचित सुहास शिरवळकर.."

Latest Marathi News Live Update : सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना 140 हुन अधिक तरुणींना गंडवणाऱ्या भामट्याला अटक

विधान परिषदेच्या तिकिटासाठी भाजप नेत्यांनी मांडले मुंबईत ठाण

SCROLL FOR NEXT