rupali bhosale  
Premier

Rupali Bhosale: म्हणून नव्या घराच्या नेमप्लेटवर नाहीये रुपाली भोसलेचं नाव; कारण सांगत म्हणते- कागदपत्र जरी...

Rupali Bhosale New House: लोकप्रिय मराठी अभिनेत्री रुपाली भोसले हिने नुकताच नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.

Payal Naik

लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले 'आई कुठे काय करते' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते. तिने नुकतंच तिचं मोठं स्वप्न पूर्ण केलं. अहोरात्र मेहनत करत तिने मुंबईत हक्काचं स्वतःचं घर घेतलं. गेले वर्षभर ती या घरावर काम करत होती. आपल्या आईवडिलांना हक्काच्या घरात नेण्याचं रुपालीचं स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. तिच्या घराचं इंटेरिअर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यात आणखी एक गोष्ट चर्चेत आहे ती म्हणजे रुपालीच्या घराची नेमप्लेट. या नेमप्लेटवर मात्र रुपालीचं नाव नाहीये. असं का हे तिने स्वतः सांगितलं आहे.

या घरासाठी खूप मेहनत करूनही रुपालीने या घराच्या नेमप्लेटवर आपलं नाव लिहिलेलं नाही. या नेमप्लेटवर रुपालीच्या आई, बाबा आणि भावाचं नाव आहे. राजश्री मराठीशी बोलताना याचं कारण सांगत रुपाली म्हणाली, 'मी त्यांच्या घरात राहतेय. माझं कायम हे म्हणणं होतं की, मला त्यांच्यासाठी काहीतरी करायच आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी करत असताना मी माझं, माझं पुढे करण्यात काही अर्थ नाहीये. मी कायम हे नवं घर बनवताना आईला कसं किचन हवंय? पप्पांना कुठला रंग हवाय? संकेतला बेडरुम कशी हवीये? याच्याकडे मी फार लक्ष दिलं आणि त्या पद्धतीनं घर करून घेतलं.'

rupali bhosale

रुपाली पुढे म्हणाली, 'कुठेही त्यांना असं वाटता कामा नये की आपलं काहीच नाहीये. पण कायदेशीर रित्या जे काही कागदपत्र आहेत तिथे जरी माझं नाव असलं तरी हे त्यांचं घर आहे.' आता चाहते रुपालीचं घर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. रुपालीने अजून तरी तिच्या घराचे आणि पूजेचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेलं नाहीत. तरीही नेटकरी वेगवेगळ्या माध्यमातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ठाणे अन् पालघरलाही सतर्कतेचा इशारा

IND vs IRE 2nd T20I : संजू ०, अभिषेक ०... भारतीय संघ संकटात; गोंधळामुळे इशान किशन रन आऊट... JAI MOONDRA पुन्हा चमकला

Vilas Ghule : विलास घुले खून प्रकरणात नवे वळण; दहावा आरोपी लातूरमधून ताब्यात, गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जप्त

Breaking : बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय! इंग्लंडच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर कोसळली वीज, थरारक दृष्य कॅमेरात कैद; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT