rupali bhosale new home  sakal
Premier

Rupali Bhosle:रुपाली भोसलेने शेअर केला नव्या घराचा व्हिडिओ; दाखवली झलक, म्हणाली, 'एकेकाळी रस्त्यावर...

Rupali Bhosale New House: लोकप्रिय मराठी अभिनेत्री रुपाली भोसले हिने तिच्या नव्या घराची झलक दाखवली आहे.

Payal Naik

आई कुठे काय करते फेम रुपाली भोसले हिने नुकतंच नवं घर घेतलं. मोठ्या थाटामाटात तिने या घरात गृहप्रवेश केला. आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना देखील तिने या पुजेसाठी बोलावलं होतं. कित्येक वर्षाची मेहनत फळाला आली असं म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. अखेर तिने एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आपला प्रवास सांगितला आहे. रस्त्यावरून, गोठ्यात आणि आता आलिशान घरात असा प्रवास करणाऱ्या रुपालीने चाहत्यांसोबत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ही पोस्ट करत रुपालीने लिहिलं, 'ह्या जगाच्या पाठीवर कुठे का होईना आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत असं म्हणतात पण एक वेळ अशी येते जेव्हा नियतीच तुमचं पाकीट मारते आणि हे स्वप्न बघायला सुद्धा तुमचं मन धजावत नाही.

लहानपणी निसर्गचित्रातील त्रिकोणी व आयताकृती घर काढताना आपण ज्या स्टेप्समध्ये घर काढतो त्या स्टेप्स मध्येच माझं घर पूर्ण होत गेलं फक्त त्या वेगवेगळ्या स्टेप्स म्हणजे माझ्या आयुष्यातली वेगवेगळी घरं होती. कोऱ्या कागदावर काहीच न काढलेली स्टेप सुद्धा माझ्यासाठी एका वेळेसचं घर होतं कारण तेव्हा आम्ही अक्षरशः रस्त्यावर राहायचो. आयुष्यातलं ते पान नवीन आणि कोरं होतं पण पेन्सिलीने चित्र काढण्याची धमक शाबूत होती. त्यानंतर चित्र काढताना आधी आपण केवळ आयताकृती भिंती काढतो, ते सुद्धा एका टप्प्यावरचं माझं घर होतं कारण तेव्हा आम्ही सगळे गोठ्यात रहात होतो. '

'केवळ भिंती...छप्पर असं काहीच नव्हतं…हां शेणाने सारवलेलं अंगण मात्र तेव्हा होतं आमच्याकडे. मग पुढे चित्रामध्ये त्रिकोणी, कौलारू छत काढलं आणि आम्हाला पत्र्याचं का होईना घर मिळालं...आयुष्य इतक्या ठिकाणी उसवलेलं की त्यापुढे त्या पत्र्यांना असलेल्या भोकांचं एवढं काही वाटायचं नाही...फक्त कोणी त्यातून आपल्याला बघू नये म्हणून पहाटे साडेतीन ला उठून आंघोळ करावी लागायची. पुढे परिस्थिती थोडी बरी झाल्यावर भाड्याची सतराशे साठ घरं बदलली... त्या सगळ्या प्रवासात अनेकदा ह्या चित्र असलेल्या कागदाचा चोळामोळा करून, फाडून फेकून द्यावा वाटला.'

'स्वतःचं घर असावं हे स्वप्नच चुकीचं आहे असं वाटायला लागलं...पण स्वप्न दाखवणा ऱ्याला खचून चालत नाही कारण त्याच्याकडे बघणारे अनेक जण असतात. त्यामुळे मान खाली घालून अथक मेहनत करत राहण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय त्याच्याकडे नसतो. मागची अनेक वर्षे काम करत खाली घातलेली मान मी जेव्हा काही दिवसांपूर्वी वर उंचावून पाहिली आणि लक्षात आलं... अरेच्चा चित्र पूर्ण झालं की आपलं...'

'परमेश्वराचे, आईवडीलांनचे आशीर्वाद, असंख्य मित्र मैत्रिणी व फॅन्स च्या सदिच्छा यांमुळे मी नवीन घरात आई, बाबा आणि संकेत सोबत प्रवेश करत आहे. तुम्ही आजवर दाखवत आलेल्या प्रेमामुळेच हे शक्य झाले आहे. मनापासून धन्यवाद!!! आणि आता वेळ आहे पूर्ण झालेल्या चित्रामध्ये मनसोक्त रंग भरण्याची.. मग ते रंग सांडून बॉर्डरच्या, कागदाच्या बाहेर गेले तरी किसको है फिकर..'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ठाणे अन् पालघरलाही सतर्कतेचा इशारा

IND vs IRE 2nd T20I : संजू ०, अभिषेक ०... भारतीय संघ संकटात; गोंधळामुळे इशान किशन रन आऊट... JAI MOONDRA पुन्हा चमकला

Vilas Ghule : विलास घुले खून प्रकरणात नवे वळण; दहावा आरोपी लातूरमधून ताब्यात, गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जप्त

Breaking : बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय! इंग्लंडच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर कोसळली वीज, थरारक दृष्य कॅमेरात कैद; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT