Sachin P and Ashok Saraf Esakal
Premier

Viral Video : "माझ्या आवडीचे पदार्थ मी दाबून खातो"; सचिन- अशोक मामांनी घेतला वडापावचा आस्वाद, व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Sachin Pilgonkar & Ashok Saraf Viral Video : अभिनेते सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांचा वडापाव खातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Viral Video Of Marathi Actors : सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ ही सुपरहिट जोडी पुन्हा एकदा 'नवरा माझा नवसाचा २' या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. या सिनेमाविषयी सगळेजण उत्सुक असतानाच या जोडीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अशोक मामा आणि सचिन पिळगावकर यांनी नुकताच कीर्ति कॉलेज येथील प्रसिद्ध अशोक वडापावचा आस्वाद घेतला सोशल मीडियावर त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताच अल्पावधीतच हा व्हिडीओ. व्हायर झाला. या व्हिडीओमध्ये सचिन यांनी वडापावचं भरभरून कौतुक केलं. 'अशोक वडापाव विथ अशोक वडाभाव' अशी कोटीही त्यांनी यावेळी केली. सिनेमा रिलीजची तारीख जाहीर केल्यानंतर सचिन आणि अशोक मामांनी आवर्जून अशोक वडापावला भेट देत तेथील स्वादिष्ट वडापाव खाल्ला.

सचिन यांच्या या व्हिडिओवर अनेकांनी भन्नाट कमेंट्स केल्या. अनेकांना आमच्यासारखे आम्हीच या अशोक सराफ आणि सचिन यांच्या गाजलेल्या सिनेमाची आठवण झाली. "आमच्या सारखे आम्ही चा तो सिन आठवला, 2किलो भजी बांध रे😍😍🔥🔥" अशी कमेंट एकाने केली आहे तर एका युझरने "माझ्या आवडीचे पदार्थ मी दाबून खातो 😂😂 in real" अशी कमेंट करत सचिन यांच्या एका जुन्या गाजलेल्या जाहिरातीची आठवण करून दिली. तर एकाने "आचाराची बायको वेडी काय , बायकोच्या जाणव्याला किल्ली काय .......😂😂😂😂😂 मस्त सर खूप छान वाटत तुम्हाला दोघांना बघून पण लक्ष्मिकांत बेर्डे सर पाहिजे होते आता 👏👏 खरच" असं म्हणत लक्ष्मीकांत यांची आठवण काढली.

Comments

सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ या गाजलेल्या जोडीचा 'नवरा माझा नवसाचा २' हा सिनेमा २० सप्टेंबर २०२४ ला रिलीज होतोय. या सिनेमात या दोघांबरोबर सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT