Sai Lokur esakal
Premier

Sai Lokur: "अतिशय लाजिरवाणी गोष्ट"; वजनावरुन ट्रोल करणाऱ्यांना सई लोकूरचं सडेतोड उत्तर

Sai Lokur: सईनं शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करुन अनेकजण तिला वजनावरुन ट्रोल करतात.

priyanka kulkarni

Sai Lokur: प्रसिद्ध अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. सईनं काही महिन्यांपूर्वी  मुलीला जन्म दिला. सईनं सोशल मीडियावर पोस्टकरुन ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. सई तिच्या कुटुंबासोबतचे तसेच तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सईनं शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करुन अनेकजण तिला वजनावरुन ट्रोल करतात. अशातच आता सईनं आता वजनावरुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

सईची पोस्ट

सईनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. तिनं पोस्टमध्ये लिहिलं, "लोकांना जाड आणि बारीक यापलिकडे काही दिसतच नाही का?"

Sai Lokur

सईनं आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, "महिलांना साधारणपणे सहा महिन्यांची प्रसूती रजा मिळते,स्वतःची आणि त्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी. मी 3 महिन्यांनी काम सुरू केले. ब्रँड कोलॅब्रेशन्स करणे,कंटेन्ट शूट करणे, इनफ्लुएन्सर म्हणून प्रोडक्ट्स प्रमोट करणं, इत्यादी कामं मी करत होते. माझ्या प्रयत्नांचे कौतुक करण्याऐवजी, लोकांना फक्त माझी फॅट बॉडी दिसते. देवा! ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण कोणत्या समाजात राहत आहोत? एकमेकांना सपोर्ट करण्याऐवजी लोक एकमेकांचे पाय खेचत आहेत."

Sai Lokur

सई लोकूरला मराठी बिग बॉस या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. कीस किसको प्यार करू,प्लॅटफॉर्म, जरब या चित्रपटांमध्ये काम केलं. सई सोशल मीडियावर अॅक्टिव असते. तिला इन्स्टाग्रामवर 322k फॉलोवर्स आहेत.

सईनं 2020 मध्ये तीर्थदीप रॉयसोबत लग्नगाठ बांधली. सई आणि तीर्थदीप यांनी त्यांच्या मुलीचं नाव ताशी असं ठेवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT