sai tamhankar sakal
Premier

Sai Tamhankar: गणिताच्या प्रश्नाचं उत्तर देताना सई ताम्हणकरचं ततपप; येईना ३ चा पाढा, तुम्हाला येतंय का उत्तर? व्हिडिओ व्हायरल

sai Tamhankar In Bus Bai Bus: अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ज्यात तिला एका साध्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये.

Payal Naik

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर सिनेक्षेत्रात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच सोबतच स्वबळावर तिने इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. मराठमोळी सई आता हिंदी चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये झळकतेय. बोल्ड आणि बिनधास्त अशी ओळख असणारी सई प्रेक्षकांची लाडकी आहे. सई सोशल मीडियावर सक्रीय असते. अशातच आता तिचा एक जुना व्हिडिओ चाहत्यांमध्ये व्हायरल होतोय. या व्हिडीओत तिला एका साध्या प्रश्नाचं उत्तर देता येत नसल्याचं दिसतंय. प्रश्नाचं उत्तर देताना गोंधळली आहे.

हा व्हिडिओ झी मराठी वाहिनीवरील 'बस बाई बस' या कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात सुबोध भावे सईसोबत बोलताना दिसतोय. मात्र त्या प्रश्नावर ती गोंधळून जाते आणि तिला साध्या प्रश्नाचं उत्तरदेखील येत नाहीये. व्हिडिओमध्ये एक महिला तिला विचारते, 'एका मुलीला खायला तीन केळी लागतात. केळीवालीकडे फक्त २ डझन केळी आहे. तर एकूण किती मुली केळी खातील? या प्रश्नावर सई ४ असं उत्तर देते. यावर सगळेच बुचकळ्यात पडतात.

यावर सुबोध तिला हे उत्तर कसं आलं असं विचारतो. तर सई म्हणते की ते नको विचारू पण चार बरोबर आहे का? सुबोध सईला दोन डझन म्हणजे किती? असं विचारतो. यावर सई १२ असं उत्तर देते. पण, लगेच तिच्या चूक लक्षात येते आणि २४ असं उत्तर देते. यानंतर सई ३ चा पाढा म्हणू लागते पण त्यात ती चुकते. यावर सई वैतागून म्हणते की तीनचाच पाढा आहे ना मग एवढा का सस्पेन्स ठेवताय सांगा उत्तर. मग सुबोध तिला बरोबर उत्तर सांगतो. तो तिला ८ मुली केळी खातील असं सांगतो.

सईच्या कामाबद्दल सांगायचं तर ती लवकरच नागराज मंजुळेच्या 'मटका किंग'मध्ये झळकणार आहे. याशिवाय 'ग्राउंड झिरो' आणि 'अग्नी' सिनेमात ती झळकणार आहे. तसेच सई ताम्हणकर 'डब्बा कार्टेल' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT