sai tamhankar  esakal
Premier

Sai Tamhankar: तुमचं काय बाबा... सई ताम्हणकरने दूर केला लोकांचा तो गैरसमज; म्हणते- त्यांना असं वाटतं की

Sai Tamhankar Talked On Myth About Film Industry : लोकप्रिय मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने प्रेक्षकांचा तो गैरसमज दूर केला आहे. इंडस्ट्रीतल्या लोकांबद्दल अनेकांचे अनेक गैरसमज असतात.

Payal Naik

छोटा पडदा ते मोठा पडदा असा प्रवास करणारी लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या हिंदी सिनेसृष्टी गाजवतेय. तिने अनेक हिट चित्रपटात काम केलं आहे. सईच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचे अनेक दिवाने आहेत. गेली अनेक वर्ष ती इंडस्ट्रीमध्ये करतेय. काही महिन्यांपूर्वीच सईने स्वतःच्या हिमतीवर मुंबईत स्वतःचं घर घेतलं. मात्र फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांबद्दल प्रेक्षकांचे अनेक गैरसमज असतात. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सईने हे गैरसमज दूर केले आहेत. सईने नुकतीच सकाळ प्रीमिअरला मुलाखत दिली. यात तिने चाहत्यांना सत्य परिस्थिती सांगितली आहे.

सकाळला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सई म्हणाली, 'हा म्हणजे मला असं वाटतं की फिल्म इंडस्ट्रीमधल्या सगळ्याच लोकांची लाइफ किती भारी असते असं अनेक लोकांना वाटतं. आणि सतत वाटत असतं. की तुमचं काय बाबा... असं एक बोलताना पटकन बोलतात. तर ते तुमचं काय बाबाच्या मागे भयंकर कष्ट, भयंकर मेहनत, प्रचंड त्याग आहे हे कुणी लक्षात घेत नाही. आणि अजून एक समज आहे की फिल्म इंडस्ट्रीमधला माणूस आहे किंवा स्त्री आहे म्हणजे लय पैसा असणार यांच्याकडे. असं पण नाहीये. मी तरी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली मुलगी आहे. आणि हे नेहमी स्टेप बाय स्टेप असतं. ते एकदम कुठली गोष्ट घडत नाही.'

सई म्हणाली, 'खूप वर्ष द्यावी लागतात. खूप वर्ष शिकावं लागतं. खूप वर्ष कंसीस्टंट्ली न थकता काम करावं लागतं. तेव्हा कुठे आता मी ठिकाणी आहे तिथेपर्यंत किमान धडकायला होतं. हे दोन गैरसमज मला लोकांचे नक्कीच दूर करायचे आहेत. की हा काय भारी... तुम्हाला काय बाबा... हे असं नाहीये.' सई लवकरच 'मानवत मर्डर्स' या वेबसिरीज मध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये ती एका वेगळ्याच भूमिकेत दिसतेय. तिच्या या लूकचं देखील कौतुक होतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT