sai tamhankar  sakal
Premier

Sai Tamhankar: त्यांनी मला सई गोसावी अशी हाक... घटस्फोटावेळी कशी होती सई ताम्हणकरची अवस्था; कोर्टातला तो प्रसंग सांगताना म्हणाली-

Sai Tamhankar Divorce: लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या घटस्फोटाबद्दल भाष्य केलं.

Payal Naik

मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाची छाप पडणारी लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर हिने चाहत्यांना आपल्या सौंदर्यानेदेखील भुरळ घातली. तिने अनेक हिट चित्रपटात काम केलं. तिचं व्यावसायिक आयुष्य जितकं चर्चेत राहिलं तितकंच तिचं वैयक्तिक आयुष्य चाहत्यांमध्ये चर्चेत राहिलं. सईने २०१३ मध्ये व्हिज्युअल आर्टिस्ट अमेय गोसावीशी लग्न केलं होतं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही आणि ते अवघ्या दोन वर्षात विभक्त झाले. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सईने त्यांच्या घटस्फोटावर भाष्य केलं आहे.

‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत सई म्हणाली, 'तुम्ही कोर्टात जाता, घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्या करता तेव्हा तुम्ही फार वेगळ्या परिस्थितीत असता. कोर्टात दोघांचंही नाव मोठ्याने घेतलं जातं, असं वाटतं जणू आपण बाजारात आहोत. मी माझं नाव बदललं नव्हतं, पण तिथे ते सई ताम्हणकर गोसावी असं म्हणायचे. तुम्ही घटस्फोट घ्यायला जाता तेव्हा तुमचं लग्नाचं नावच तिथे घेतलं जातं. त्यामुळे माझंही नाव तसंच घेतलं गेलं. कोर्टातील या सगळ्या अनुभवानंतर थोडं चिल करायचं होतं, त्यामुळे आम्ही ड्रिंक्स घ्यायला बाहेर गेलो. तिथे रडारड झाली, थोडं प्रेमाने एकमेकांशी बोलणं आणि आयुष्यासाठी एकमेकांना सल्ले देऊन झालं.'

पुढे सई म्हणाली, 'आमच्या जवळच्या मित्रांना आमच्या घटस्फोटाबद्दल ठाऊक होतं. ते फोन करून विचारत होते, मग ज्यांचे फोन आले त्यांना सांगितलं आम्ही इथे इथे आहोत आणि ८-१० लोक जमल्यावर आम्ही दारू प्यायलो. पार्टी केली. मी मान्य करते की माझी फसवणूक झाली. मी लहान वयात एका अतिशय वाईट नात्यात होते आणि त्या गोष्टीतून मी खूप काही शिकले.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan EMI: महिन्याला ३.५ लाख पगार, तरीही १.७ कोटींचं घर घेतलं नाही! EMI पाहून कपलने का घेतला मोठा निर्णय?

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीसाठी जाहीर केला १४ सदस्यीय संघ; दुखापतीचा फटका, तरी मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी मजबूत मोर्चेबांधणी

Viral News : खेळता खेळता ५ वर्षांच्या मुलीने गिळलं ५० ग्रॅम सोनं; डॉक्टरांनी असं काढलं बाहेर!

Marathi News Live Updates : जयपूरमध्ये आशुतोष रांका यांच्यावर हल्ला; ‘भाजपच्या गुंडांकडून सीजेपी कार्यकर्त्यांना मारहाण’ - अभिजीत दिपके यांचा आरोप

Mumbai News: पीओपी मूर्तींबाबत हायकोर्टाचा दिलासा, सहा फुटांवरील गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांत विसर्जनाचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT