Sai Tamhankar esakal
Premier

Sai Tamhankar: अभिनयचं नाही तर सईने शाळेत असताना 'या' क्षेत्रातही केलंय काम, "मी बोनस पॉईंट मिळवण्यासाठी प्रसिद्ध होते..."

Sai Tamhankar: सईने एका मुलाखतीत तिच्या लहानपणीच्या काही खास आठवणी शेअर केल्या.

priyanka kulkarni

Sai Tamhankar: मराठी इंडस्ट्रीमधील बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) कायमच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. नुकतंच सईने तिच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. सईने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लहानपणीच्या काही खास आठवणी शेअर केल्या.

काही दिवसांपूर्वी सईने गुढीपाडव्याच्या निमित्ताने सईने मॅशेबल इंडियाच्या द बॉम्बे जर्नी या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी सईने लहानपणीच्या आठवणी सांगताना ती शाळेत असताना कब्बडी खेळायची हे शेअर केलं. तिने हे सांगताच शोच्या होस्टला आश्चर्य वाटलं आणि त्याने तू कुठल्या स्तरावर कबड्डी खेळली आहेस असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना सई म्हणाली,"मला कबड्डी हा खेळ खूप आवडतो. हा खूप शक्तिप्रदर्शन दाखवणारा खेळ आहे. शाळेत असताना मी कबड्डी खेळायचे. मी राज्य स्तरापर्यंत कबड्डी खेळली आहे. राज्य स्तरावरची मॅच आम्ही हरलो तरीही मला खूप अभिमान आहे. मी कबड्डीमध्ये चढाई करायचे आणि मी बोनस पॉईंट मिळवण्यासाठी प्रसिद्ध होते. विरुद्ध टीमच्या चार प्लेयर्सना घेऊन बोनस पॉईंट मिळवणे ही माझी स्टाईल होती." असं सई ही आठवण सांगताना म्हणाली. यावर तिच्या लहानपणीच्या ताकदीचं रहस्य विचारलं असताना ती म्हणाली,"मी लहानपणी खूप दूध प्यायचे. मला माझ्या आईने दूध प्यायची सवय लावली होती. ती त्याबाबत इतकी दक्ष होती कि एकदा मी दूध प्यायचं विसरून शाळेत गेले तेव्हा ती वॉटरबॉटलमध्ये दूध भरून ती बॉटल माझ्या बाबांसोबत शाळेत पाठवली होती. मोठं झाल्यावर अर्थातच माझी सवय सुटली आणि आता मी कॉफी लव्हर झाले आहे." असं ती म्हणाली.

सईने याच मुलाखतीमध्ये लवकरच दुनियादारी 2 येणार असल्याचं रिव्हील केलं होत. तिच्या या खुलास्याने चाहते खुश झाले होते. तर ती नुकतीच भक्षक या हिंदी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या सिनेमात तिने एसएसपी जस्मित कौर ही भूमिका साकारली होती.

काही दिवसांपूर्वीच सईने स्वतःला मर्सिडीझ बेंझ ही गाडी गिफ्ट केली. गुढीपाडव्याच्या दिवशी तिने घेतलेल्या या गाडीने तिचे चाहते खुश झाले. सोशल मीडियावर सईने तिच्या नव्या कारसोबत फोटोज सुद्धा शेअर केले होते. सईची आईसुद्धा यावेळी भावूक झालेली पाहायला मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर गोविंदा पत्नीपासून वेगळा होणार, सुनीताने वांद्रे कोर्टात दाखल केला घटस्फोटाचा अर्ज; कोणकोणते आरोप केले?

Ganesh Chaturthi 2025 : 'या' गणेश चतुर्थीला एक-दोन नाही तर बनत आहेत 5 महायोग; या राशींवर बाप्पा होणार खुश

Video: थरारक! पवई तलावामध्ये मगरीने कबुतराला गिळले; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

Hidden Liver Damage: लक्षणं न जाणवता यकृत होतंय कमजोर… ‘सायलेंट किलर’बाबत डॉक्टरांचा धोक्याचा इशारा!

Sharad Pawar: उपराष्ट्रपतीसाठी राधाकृष्णन यांना पाठिंबा द्या, मुख्यमंत्र्यांचा मला फोन, खुलासा करत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

SCROLL FOR NEXT