Saira Banu esakal
Premier

Saira Banu: लिव्ह-इन रिलेशनशिपच्या मुद्द्यावरुन झीनत अमान आणि मुमताज यांच्यात झालेल्या वादात सायरा बानोंची उडी; म्हणाल्या...

Saira Banu: मुमताज आणि झीनत अमान यांच्यात झालेल्या वादाबद्दल आता अभिनेत्री सायरा बानोंनी (Saira Banu) एका मुलाखतीत सांगितलं.

priyanka kulkarni

Saira Banu: मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांमध्ये विविध विषयांवरुन मतभेद होत असतात. ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) यांनी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन लग्नाआधी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सल्ला चाहत्यांना दिला होता. त्यानंतर अभिनेत्री मुमताज (Mumtaz) यांनी झीनत अमान यांच्या या विचारांवर टीका केली होती. लिव्ह-इन रिलेशनशिप या मुद्द्यावरुन मुमताज आणि झीनत अमान यांच्यात झालेल्या वादाबद्दल आता अभिनेत्री सायरा बानोंनी (Saira Banu) एका मुलाखतीत सांगितलं.

झीनत अमान यांची पोस्ट

झीनत अमान यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "तुमच्यापैकी एकाने मला माझ्या आधीच्या पोस्टच्या कमेंट करुन रिलेशनशिपबद्दल सल्ला विचारला होता. माझं वैयक्तिक मत आहे की, जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तर मी तुम्हाला सल्ला देईल की, लग्न करण्यापूर्वी एकत्र राहा! हाच सल्ला मी नेहमी माझ्या मुलांना दिला आहे, ते दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले आहेत." झीनत अमान यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. झीनत यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या सल्ल्यावर मुमताज यांनी टीका केली.

काय म्हणाल्या मुमताज?

मुमताज यांनी झीनत अमान यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या सल्ल्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, "आपण कोणता सल्ला देत आहोत, याची काळजी झीनतने घ्यावी. झीनतचे स्वत:चे लग्न नरकाप्रमाणे होते. तिला अचानक सोशल मीडियावर लोकप्रियता मिळाली.पण नैतिक मूल्यांच्या विरुद्ध जाऊन सल्ला देणे हा फॉलोवर्स वाढण्याचा मार्ग नाही"

सायरा बानोंनी मांडले मत

लिव्ह-इन रिलेशनशिपच्या मुद्द्यावरुन मुमताज आणि झीनत अमान यांच्यात झालेल्या वादावर सायरा बानोंनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "मी याबद्दल जास्त वाचले नाहीये. त्या (मुमताज आणि झीनत) जे बोलतात त्यावर माझा खरोखर विश्वास नाही. आपण खूप जुन्या पद्धतीचे लोक आहोत. आमचा ट्रेंड 40-50 वर्षांपूर्वीचा आहे."

मुमताज यांनी केलेल्या टीकेवर देखील झीनत यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. मी कधीही इतरांच्या वैयक्तिक जीवनावर भाष्य करणारा किंवा माझ्या सहकार्यांचा अपमान करणारा नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मातीत राबणारेच मातीला मिळाले! महाराष्ट्रात 8 महिन्यांत तब्बल 1183 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, धक्कादायक आकडेवारी समोर...

Nepal Royal Massacre: कशी संपली होती नेपाळची राजेशाही ? राजकुमाराने राजा-राणीसह राजघराण्यातील 9 जणांची केली होती हत्या अन्..

T20 World Cup 2026 Date: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची तारीख आली समोर, फायनल नरेंद्र मोदी स्टेडियमवर...१५ संघ पात्र, ५ जागा शिल्लक...

Bandu Andekar: आयुष माझा वैरी आहे का? मला मारायचं असतं तर… कोर्टात बंडू आंदेकराचा मोठा दावा; युक्तिवादाची A टू Z माहिती

Ro-Ro Ferryboat: फेरी बोटचे मोठे अपडेट! आता प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार; सागरी महामंडळाचा निर्णय

SCROLL FOR NEXT