Rinku shares Sairat's unseen photos 
Premier

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Director Nagraj Manjule's Sairat Completes 8 Years: २०१६ साली रिलीज झालेला नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' सिनेमाला आठ वर्षं पूर्ण झाली. यानिमित्त रिंकूने शेअर केलेले फोटो चर्चेत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

२०१६ साली रिलीज झालेला नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' सिनेमा रातोरात सुपरहिट झाला. आरची आणि परश्याच्या जोडीने संपूर्ण महाराष्ट्राला 'याडं' लावलं. बॉक्स ऑफिसवर ११० करोड रुपयांचं कलेक्शन करणारा हा पहिला मराठी सिनेमा ठरला आणि नुकतीच या सिनेमाला ८ वर्षं पूर्ण झाली.

अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतंच सैराटला आठ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काही जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तिने हे फोटो शेअर करताच आठ वर्षांपूर्वीचा रिंकूचा लूक आणि तिच्यात इतक्या वर्षांमध्ये झालेले बदल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ती आठवीत शिकत असताना तिने या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. तेव्हाचे रिंकू-आकाश आणि सिनेमाला यश मिळाल्यानंतर त्यांच्यात घडलेला बदल खरंच लक्ष वेधून घेणारा आहे.

पडद्यामागील रिंकू-आकाशची धमाल, घोडेस्वारी करतानाचा फोटो आणि तिचं पहिलं फोटोशूट या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. "सैराटला आज ८ वर्ष पुर्ण झाली…" असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट करत सैराटचे तिचे गाजलेले संवाद पोस्ट केले आहेत. तर काहींनी,"मराठी चित्रपट जगताला वरच्या टोकावर नेण्याचा आणि मराठीची ताकद जगाला दाखवण्याचा नागराज मंजुळेचा सर्वोत्तम प्रयत्न होता. अजय-अतुल यांनी आपल्या ज्ञानाने मराठी संगीत जगभर गाजवले. उमदा अभिनय परश्या आर्ची" असं म्हणत या सिनेमाचं कौतुक केलं तर एकाने सैराटचा दुसरा पार्ट काढण्याची मागणी केली आहे.

Fan demanded sequel of Sairat
Fan praised sairat movie

या सिनेमातील भूमिकेसाठी रिंकूला तिच्या उत्तम अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता तर बॉलिवूडकरांचंही या सिनेमाने लक्ष वेधून घेतलं होतं. २०१६ वर्षातील सगळे महत्त्वाचे पुरस्कार या सिनेमाला मिळाले होते. अजय-अतुल या संगीत दिग्दर्शक जोडीने संगीतबद्ध केलेली सगळी गाणी सुपरहिट झाली होती. आजही ही गाणी महाराष्ट्रात सुपरहिट आहेत.

रिंकू-आकाशच्या डेटिंगच्या चर्चा

या सिनेमानंतर रिंकू आणि आकाश डेट करत असल्याचीही चर्चा काही काळ रंगली होती. पण यात काहीही तथ्य नसल्याचं या दोघांनीही मुलाखतींमध्ये कबूल केलं होतं. या सिनेमानंतर ही जोडी नागराज मंजुळे यांच्या झुंड या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. पण त्यानंतर अजूनतरी या दोघांनी एकत्र काम केलं नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT