Sakal Premier Award sakal
Premier

Sakal Premier Award 2024 : कोठारे, उसगावकर यांच्या कर्तृत्‍वाचा विशेष सन्मान!

मराठी चित्रपटसृष्टीत देदीप्यमान कामगिरी करणारे ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे अन् अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार’ सोहळ्यात विशेष सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीत देदीप्यमान कामगिरी करणारे ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे अन् अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार’ सोहळ्यात विशेष सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात बुधवारी, १२ जूनला होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल गौरवण्यात येणार आहे.

पी. एन. जी. ज्वेलर्स लि. प्रीमियर पुरस्कार सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेत्री, अभिनेता, कथा, पटकथा, गीतकार, संकलक इत्यादी पुरस्कारांबरोबरच काही मान्यवरांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.

‘छोटा जवान’द्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या महेश कोठारे यांनी ‘धूमधडाका’, ‘थरथराट’, ‘पछाडलेला’, ‘झपाटलेला’, ‘दे दणादण’, ‘माझा छकुला’ इत्यादी अनेक चित्रपट केले आहेत. अभिनयाबरोबरच एक उत्तम दिग्दर्शक अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.

पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. केवळ मोठ्याच नव्हे; तर छोट्या पडद्यावरही त्यांनी निर्माता म्हणून उत्तम कामगिरी केली. मराठी चित्रपटसृष्टीत देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या कोठारे यांना ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार’ सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून वर्षा उसगावकर यांचे नाव आवर्जून घेतले जाते. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. रंगभूमीवर काम करत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ‘कार्टी प्रेमात पडली’ आणि ‘ब्रह्मचारी’ या नाटकांत त्यांनी दमदार अभिनय केला.

‘गंमत-जंमत’ चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘हमाल दे धमाल’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’, ‘सवत माझी लाडकी’, ‘एक होता विदूषक’, ‘लपंडाव’, ‘अफलातून’ आदी अनेक गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. अभिनय क्षेत्रातील त्यांच्या उत्तम कामगिरीसाठी त्यांचा पुरस्कार सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

कधी : बुधवार, १२ जून २०२४

कुठे : डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, घोडबंदर रोड, मानपाडा, ठाणे (पश्चिम)

केव्हा : संध्याकाळी ६ वाजता | सर्वांना प्रवेश खुला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

SCROLL FOR NEXT