Sakal Premier Award 2024 sakal
Premier

Sakal Premier Award 2024 : गौरी देशपांडे, प्रियदर्शनी इंदलकर पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चेहरा;संतोष जुवेकर सर्वोत्कृष्ट खलनायक

‘सकाळ प्रीमियर पुरस्कारा’ची नामांकने जाहीर झाल्यानंतर आता सर्वांनाच विजेत्यांच्या नावाचे वेध लागले आहे. गेल्या वर्षभरात अनेक दर्जेदार कलाकृतींनी मराठी चित्रपटससृष्टीवर आपला ठसा उमटवला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘सकाळ प्रीमियर पुरस्कारा’ची नामांकने जाहीर झाल्यानंतर आता सर्वांनाच विजेत्यांच्या नावाचे वेध लागले आहे. गेल्या वर्षभरात अनेक दर्जेदार कलाकृतींनी मराठी चित्रपटससृष्टीवर आपला ठसा उमटवला. अनेक कलाकारांनी आपल्या सशक्त अभिनयाची झलक दाखवली. साहजिकच यंदाच्या विजेत्यांची कामगिरी मोलाची ठरली आहे.

अभिनेता संतोष जुवेकरच्या अभिनयाची दखल घेत ‘रावरंभा’ चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट खलनायकाच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अभिनेत्री गौरी देशपांडे आणि प्रियदर्शनी इंदलकर यांना अनुक्रमे ‘श्यामची आई’ अन् ‘फुलराणी’साठी ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण चेहरा’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रीमियर पुरस्कारांची नामांकने जाहीर झाली असून सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शकाच्या स्पर्धेत ‘आत्मपॅम्फ्लेट’, ‘महाराष्ट्र शाहीर’ आणि ‘नाळ २’ आघाडीवर आहेत. नामांकने जाहीर झाल्यापासून मराठी चित्रपटसृष्टीत पुरस्कार सोहळ्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सोहळ्याला कलाकारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळ्या’चे यंदाचे चौथे वर्ष आहे. पी. एन. जी. ज्वेलर्स लि.सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत.

राजकीय, सामाजिक अन् उद्योग क्षेत्रातील मान्यवर मंडळी त्यास आवर्जून उपस्थित राहणार आहेत. मनोरंजनाचा धमाकेदार कार्यक्रम आणि नृत्य-संगीताच्या सुरेल मैफिलीत सहभागी होण्याची संधीही रसिकांना मिळणार आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेता व अभिनेत्री, दिग्दर्शक, सहायक अभिनेता-अभिनेत्री आदी विविध विभागांत पुरस्कार दिले जाणार आहेत. सोहळा सर्वांसाठी खुला असून त्यात रसिकांना विनामूल्य उपस्थित राहता येणार आहे. मराठी मनोरंजन वाहिनीवर त्याचे प्रक्षेपणही केले जाणार आहे.

कधी : बुधवार, १२ जून २०२४ | कुठे : डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, घोडबंदर रोड, मानपाडा, ठाणे (पश्चिम) |

केव्हा : संध्याकाळी ६ वाजता | प्रवेश विनामूल्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठा-कुणबी प्रमाणपत्राच्या निर्णयावर भटक्या-विमुक्त जमाती संघटना संतप्त, उपोषणाचा इशारा, तारीखही सांगितली!

"वन नाईट स्टँड करणार नाही! इंटिमेंट सीन देताना घाबरली अभिनेत्री जरीन खान म्हणाली...'कुणाशीही इंटिमेट होण्यासाठी...'

Arun Gawli: दाऊदने केलेला 'तो' खून अन् अरुण गवळी बनला अंडरवर्ल्ड डॉन; मुंबईत दगडी चाळीचं साम्राज्य कसं वाढलं?

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पोलीस विभागाच्या विशेष कारवाईत ७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

Pune Ganeshotsav : विसर्जन मिरवणुकीनिमित्त प्रमुख १७ रस्ते वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग आणि पार्किंगची व्यवस्था, जड वाहनांना शहरात प्रवेशास बंदी

SCROLL FOR NEXT