Sakal Premier Awards 2024 is pure and auspicious Varsha Usgaonkar Sakal
Premier

Sakal Premier Awards 2024 : हा पुरस्कार पवित्र अन्‌ मंगलमय : वर्षा उसगावकर

सिनेसृष्टीतील विशेष योगदानाबद्दल पुरस्कार सोहळ्यात वर्षा उसगावकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Sakal Premier Awards 2024 :: माझ्या प्रसिद्ध आणि दुर्लक्षित कामांची दखल घेत मला ‘सकाळ समूहा’ने दिलेला ‘सकाळ प्रीमियर अवॉर्ड’ हा माझ्यासाठी अत्यंत पवित्र आणि मंगल आहे. यामुळे माझी पुढची वाटचाल आणखी दमदार होईल. हा आदर्श पुरस्कार आहे, अशा शब्दांत पुरस्कार विजेत्या वर्षा उसगावकर यांनी भावना व्‍यक्त केली.

सिनेसृष्टीतील विशेष योगदानाबद्दल पुरस्कार सोहळ्यात वर्षा उसगावकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करून ‘सकाळ’ला धन्यवाद दिले. वर्षा उसगावकर पुढे म्हणाल्या, ‘‘या पुरस्काराबद्दल मी कृतज्ञ आहे. ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ अशीच भावना यावेळी माझ्या मनात येत आहे.

आपल्या अनेक कामांपैकी काहींची स्तुती होते, तर काही दुर्लक्षित राहतात. काही नाटके-चित्रपट चालतात तर काही चालत नाहीत. दुर्लक्षित कामाची कोणी दखल घेतली नाही, असे आपल्याला वाटते; पण कोणीतरी ती कामेही बघत असते. म्हणूनच ‘सकाळ’ने मला दिलेला हा पुरस्कार माझ्यासाठी विशेष आहे. या पुरस्कारामुळे माझा हुरूप वाढला आहे. मी ‘सकाळ’ची ऋणी आहे.’’

आपल्या कारकिर्दीला सहाय्यभूत ठरणारे सचिन पिळगावकर, सतीश कुलकर्णी यांसारखे निर्माते-दिग्दर्शक, वसंत सबनीस, संगीतकार अनिल मोहिले, दामू केंकरे, तसेच सेकंड इनिंगमध्ये आपल्याला नाटके, सिरीयलमध्ये भूमिका देणारे प्रशांत दामले, महेश कोठारे यांचाही उल्लेख केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Stock India: देशात पेट्रोल-डिझेलचा साठा किती दिवसांचा? केंद्र सरकारने जनतेला दिली स्पष्ट माहिती

IPL 2026 Controversy: टीम डेव्हिडला अखेर शिक्षा मिळाली! BCCI ने "अश्लील हातवारा" करणाऱ्या RCB च्या फलंदाजाला घडवली अदद्ल...

Fuel Shortage: नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर सरकारचे मोठे स्पष्टीकरण; पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाची माहिती समोर

Thane Crime: ठाण्यात तीन कोटींचे चरस जप्त, गुजरातमधील एका संशयिताला गुन्हे शाखेकडून अटक

Thane Metro: मेट्रोचा प्रवास लांबणार! ठाण्यात चाचणीचा डबा धूळखात; पायाभूत सुविधांचे काम अर्धवट

SCROLL FOR NEXT