Salman Khan Firing fireing sakal
Premier

Salman Khan Firing: सलमानच्या घरावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांची ओळख पटली, पोलिसांनी सांगितला पूर्ण घटनाक्रम

पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली सलमानच्या घरावर हल्ला करणाऱ्या या दोन हल्लेखोरांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.

सकाळ वृत्तसेवा

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्याची बातमी सध्या सगळीकडेच गाजतेय. रविवारी 15 एप्रिलला झालेल्या या हल्ल्यावेळी सलमानसह त्याचे सगळे कुटूंबीय घरातच उपस्थित होते.

त्याच्यावरील या हल्ल्यामुळे देशभरातील त्याचे चाहते चिंतीत असून सुरक्षायंत्रणासुद्धा सक्रिय झाल्या आहेत. पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली सलमानच्या घरावर हल्ला करणाऱ्या या दोन हल्लेखोरांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपासला सुरुवात करत आसपासचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली. या फुटेजमधून या हल्लेखोरांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा हल्लेखोर विशाल उर्फ काळू नावाचा गुंड असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. विशाल हा रोहित गोदारा गँगशी संबंधित असून या आधी त्याच्यावर सचिन गोडा या व्यावसायिकाच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर बाईक माऊंट मेरी इथे सोडून गेले आणि त्यांनी पुढील प्रवास रिक्षेने केला. ते महाराष्ट्राबाहेर पळालेले असू शकतात असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. दोन्ही हल्लेखोर हरियाणा किंवा राजस्थान या भागातील रहिवासी असल्याचा अंदाज आहे. या हल्लेखोरांना प्रवासात कुणी मदत केली आणि त्यांना हत्यारे कुणी पुरवली याचा सध्या पोलीस तपास करत आहेत.

सलमानच्या घरावरील हल्ल्याची बातमी सगळीकडे पसरल्यानंतर लॉरेंस बिश्नोई गँगच्या अनमोल बिश्नोईने फेसबुक पोस्ट शेअर करत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

सुरुवातीला पोलिसांनी या पोस्टला गांभीर्याने घेतलं नाही पण हल्लेखोरांच्या चेहऱ्याची ओळख पटताच हा हल्ला बिश्नोई गॅंगतर्फेच केलेला असावा अशी खात्री पोलिसांची पटलेली आहे.

या आधीही सलमानला लॉरेंस बिश्नोई गँगतर्फे धमक्या मिळाल्या होत्या. सलमानच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली असून त्याला आता वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात येणार असल्याचं म्हंटलं जातंय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Pune: 'आर्टी'च्यावतीने शनिवारी पुण्यात अभियंता उद्योजक कार्यशाळा

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Pachod News : गुन्हा दाखल केलेल्या इसमांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने एकाने व्हिडीओ बनवून केले विष प्राशन; घाटी रुग्णालयात उपचार सुरू

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

SCROLL FOR NEXT