salman khan fireing update sakal
Premier

Salman Khan Firing Case : सलमान खान फायरिंग प्रकरणात आणखी दोघे पोलिसांच्या ताब्यात; शुटर्सकडे कुठून आलं पिस्तुल?

संतोष कानडे

नवी दिल्लीः बॉलिवुड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. मुंबई क्राईम ब्रँचने दावा केलाय की, पकडलेल्या दोन तरुणांनी सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग करणाऱ्यांना पिस्तुल उपलब्ध करुन दिलं होती.

गुरुवारी पकडलेल्या आरोपींनीच मुख्य आरोपी सागर पाल आणि विक्की गुप्ता यांना ४० राऊंड गोळ्या आणि पिस्तुल दिल्याचा दावा केला जातोय. या दोघांना पंजाबमधून अटक केली आहे. तर तिकडे सागर पाल आणि विक्की गुप्ता यांना पोलिसांनी कोर्टासमोर हजर केलं होतं.

क्राईम ब्रँचने कोर्टात सांगितलं की, गोळीबाराची घटना घडल्यानंतर या दोघांनी आपले कपडे तीनवेळा बदलले आणि कोणाला ओळखू येऊ नये म्हणून वेश बदलण्याचा प्रयत्न केला.

१८ गोळ्यांचा अजून तपास लागला नाही

क्राईम ब्रँचने या प्रकरणाचा खुलासा करत सांगितलं की, दोन्ही आरोपींकडे घटनेच्या वेळी एकूण ४० गोळ्या होत्या. त्यांनी फायरिंगसठी ५ गोळ्या वापरल्या. १७ गोळ्या पोलिस तपासात जप्त करण्यात आलेल्या आहेत. पोलिसांना अजूनही १८ गोळ्यांचा तपास लागलेला नाही.

दरम्यान, सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं की, सागर आणि विक्की हे बिहारचे राहणारे आहेत. त्यांना कुणाकडून आर्थिक मदत मिळत होती, हे तपासणं महत्त्वाचं आहे. दोघांचंही सलमान खानसोबत वैर नव्हतं. तरीही त्यांनी बॉलिवुड स्टारच्या घराबाहेर फायरिंग का केलं? त्यांना कोण आणि कुठून आदेश देत होतं? हे तपासामध्ये समोर येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: भारतीय संघाचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं! अर्जेंटिनाकडून 'करो या मरो'च्या सामन्यात पराभवाचा मोठा धक्का

Wai Tree Transplantation: कुऱ्हाड थांबली, वृक्षांना मिळाले नवजीवन! वाईत ४० वर्षे जुन्या १९ वृक्षांचे पुनर्रोपण यशस्वी

IND vs SL, Test: ध्रुव जुरेलने 'जय जवान, जय किसान' टॅटू का काढला? स्वत:च केला खुलासा; रिषभ पंतच्या दुखापतीवरही दिली अपडेट

सुरुवातीला घाबरली, हातातली राखी पाहताच धावत आली; भावाने बहिण दिलं असं गिफ्ट, सोशल मीडियावर भावूक करणारा VIDEO

Western Railway: टीसी कुठे आहेत, हे आता क्षणार्धात कळणार! जीपीएस स्मार्ट जॅकेटसह पश्चिम रेल्वेचा नवा प्रयोग

SCROLL FOR NEXT