Salman Khan 
Premier

भाईजानला काही करु नका, त्याने..; बिश्नोईकडे सलमानच्या जीवाची भीक मागत अभिनेत्री ढसाढसा रडली, पाहा व्हिडिओ

Salman Khan firing case: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याच्या घराबाहेर दोघांनी गोळीबार केला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री हादरली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याच्या घराबाहेर दोघांनी गोळीबार केला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री हादरली आहे. अनेकांनी सलमान खानच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असणारी राखी सावंत हिचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. (Salman Khan firing case Rakhi Sawant pleads to Lawrence Bishnoi to not harm bhai jaan)

व्हिडिओमध्ये राखी सावंत हात जोडून ढसाढसा रडताना दिसत आहे. काहीजण तिच्या या व्हिडिओची थट्टा करत आहेत. तर काहीजण या तिच्या व्हिडिओला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत. व्हिडिओमध्ये राखी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडे सलमान खानच्या जीवाची भीक मागत आहे. बिश्नोईने भाईजानला सोडावे असं ती म्हणत आहे.

राखीच्या व्हिडिओमध्ये काय आहे?

राखी व्हिडिओमध्ये म्हणाली आहे की, सलमान खानला जगू द्या. माझ्या भाईसोबत असं करु नका. मी तुमच्यासमोर हात जोडते. बिश्नोई ग्रुप. माझ्या भाईसोबस असं करु ना. प्लीज. मी तुम्हाला विनंती करते असं करु ना. ते लीजेंड आहेत. त्यांनी अनेकांचे घरं वाचवले आहेत. अनेक गरीब लोकांचे भले केले आहे.

मी तुमच्यासमोर हात जोडते. तुम्हाला काय मिळेल. त्यांची एनजीओ आहे. त्यांच्यामुळे अनेकांचे घरे चालतात. माझ्या सारख्या गरिबाला देखील त्यांनी मदत केलीये. माझ्या आईचे ऑपरेशन त्यांनी केलं होतं. त्यांना सोडून द्या. मी त्यांची फॅन आहे. ईदच्या वेळेस ते खूप मदत करतात. त्यांनी आपला संसार देखील थाटला नाही. पण, दुसऱ्याचे घरं बसवतात. ते साधारण जीवन जगतात. मी बिश्नोई ग्रुपसमोर हात जोडते, असं राखी म्हणाली आहे.

राखीला केलं जातंय ट्रोल

राखीच्या या व्हिडिओनंतर तिला ट्रोल केलं जात आहे. नाटक करु नको असं काहींनी सल्ला दिला आहे. केवळ प्रसिद्धीसाठी राखी असा व्हिडिओ करत आहे, असं एकाने म्हटलं. दरम्यान, सलमानच्या घरासमोरील गोळीबार प्रकरणामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रँचने ही कारवाई केली आहे. आरोपींनी वापरलेल्या शस्त्रांचा शोध सुरु आहे. (Salman Khan)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: ''बप्पा तुम्ही भाग्यवान.. कापनीच्या वेळी आलात'' पंकजा मुंडेंकडून बजरंग सोनवणेंना चिमटा

Modi-Shivraj Singh Chouhan : मोदींना पहिल्यांदा कधी भेटले होते शिवराज सिंह चौहान? जाणून घ्या, 'ती' खास आठवण!

Digital Panvel: ‘डिजिटल पनवेल’साठी पहिले पाऊल! महापालिका कार्यालयात किओस्क यंत्रणेचा वापर

Budhwar Peth Pune: तरुण बुधवारपेठेत गेला पण पैसे देताना पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला, तीन महिलांनी असं काही केलं की....

10-20 करोड नाही तर सिडनी स्वीनीला बॉलिवूड फिल्मसाठी ऑफर केले इतके रुपये, ती सुद्धा झाली SHOCK !

SCROLL FOR NEXT