Salman Khan esakal
Premier

Salman Khan: सलमान खानच्या घराबाहेर पहाटे काय घडलं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.. पाहा व्हिडीओ

Salman Khan: पहाटे 5 वाजेच्या सुमारास दोन व्यक्तींनी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला. अशातच आता या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

priyanka kulkarni

Salman Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर आज पहाटे गोळीबार झाला. पहाटे 5 वाजेच्या सुमारास दोन व्यक्तींनी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला. मुंबई (Mumbai) पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. अशातच आता या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या फुटेजमध्ये दोन बाईकस्वार दिसत आहेत.

सलमान खानच्या वांद्रेतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पहाटे 5 वाजेच्या सुमारास दोन व्यक्तींनी अंदाधुंद गोळीबार केला. याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या फुटेजमध्ये दोन बाईकस्वार दिसत आहेत, आता मुंबई पोलीस या सर्व घटनेचा तपास करत आहेत.

पाहा व्हिडीओ:

मुख्यमंत्र्यांचा सलमानला फोन

गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानला फोन करुन धीर दिला.तुमच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलमानला सांगितलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सलमान खानची सुरक्षा वाढवण्याची सूचना दिली आहे.

फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी हजर झाली आहे. तसेच सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणाबाबत सुप्रिया सुळे, संजय राऊत या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. "हे अत्यंत दुर्दैवी आहे कारण सलमान खान ज्या भागात राहतो तो भाग खूप प्रसिद्ध आहे हे गृह खात्याचे अपयश आहे.सलमानच्या कुटुंबावर दबाव आहे." , अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली, तर संजय राऊत म्हणाले, "सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार हा इशारा आहे की,या मुंबईत कधीही आणि कुठेही गोळ्या झाडल्या जाऊ शकतात."

ईदनिमित्त सलमाननं त्याच्या घराच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. सलमानची एक झलक पाहण्यासाठी चाहते गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर गर्दी करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT