Firing at Salman Khan's house Esakal
Premier

Firing at Salman Khan's house: सलमान खान गोळीबार प्रकरणी नवीन अपडेट; इंटरनेट कॉलिंगवरुन संपर्कात होते आरोपी, कसं मिळवलं पिस्तुल?

Firing at Salman Khan's house: आरोपी सागर पालचा भाऊ सोनू पाल याची मुंबई गुन्हे शाखा चौकशी करत आहे. सोनू पाल हरियाणातही काम करत होता आणि त्याचा भाऊ सागर पाल याच्याशी फोनवर सतत संपर्कात होता. त्याचवेळी आरोपी इंटरनेट कॉलिंगद्वारे एकमेकांशी संपर्क साधत असल्याचे या प्रकरणात समोर आले आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Firing at Salman Khan's house: सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी सातत्याने नवनवीन खुलासे समोर येत आहेत. मुंबई क्राइम ब्रँच या प्रकरणातील आरोपी सागर पालचा भाऊ सोनू पाल याचीही चौकशी करत आहे. पोलिस तपासात असे निष्पन्न झाले आहे की, दुचाकीवर मागे बसलेल्या हल्लेखोर सागर पाल याने सलमानच्या घरावर गोळी झाडली होती. तर विकी गुप्ता हा दुचाकी गाडी चालवत होता. दुचाकी चालवत असताना विकी लॉरेन्स टोळीच्या संपर्कातही होता. याशिवाय आरोपी इंटरनेट कॉलिंगद्वारे संवाद साधत असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई क्राइम ब्रँच आरोपी शूटर सागर पालचा भाऊ सोनू पाल याची चौकशी करत आहेत. सोनू पाल हरियाणातही काम करत होता आणि त्याचा भाऊ सागर पाल याच्याशी फोनवर सतत संपर्कात होता. त्याचवेळी आरोपी इंटरनेट कॉलिंगद्वारे एकमेकांशी संपर्क साधत असल्याचे या प्रकरणात समोर आले आहे.

इंटरनेट कॉलिंगद्वारे होते संपर्कात

त्याचबरोबर सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी आणखी एका संशयिताला हरियाणातून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, कुख्यात गुंड अनमोल बिश्नोईच्या कथित कटाची अधिक माहिती गोळा करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने चार पथके नवी दिल्ली, बिहार, गुजरात आणि राजस्थान येथे पाठवली आहेत. बिश्नोई हा अटक करण्यात आलेल्या शार्पशूटर सागर पाल आणि विकी गुप्ता यांच्याशी इंटरनेट कॉलिंगद्वारे थेट संपर्कात होता अशी माहिती समोर आली आहे.

पोलीस शस्त्र पुरवठादाराचा घेत आहेत शोध

या कामासाठी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना यापूर्वीच एक लाख रुपये देण्यात आले होते आणि काम पूर्ण झाल्यानंतर 3 लाख रुपये मिळणार होते. बिश्नोईच्या सांगण्यावरून दोघांनी 14 एप्रिल रोजी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार केला होता. बिष्णोई यांच्याशी बोलण्यासाठी त्याने फोन ऑन केल्यावर तो पोलिसांच्या रडारवर आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ एप्रिलच्या रात्री गोळीबाराच्या काही तास आधी बंदुकांचा पुरवठा करण्यात आला होता.

घटनेनंतर शस्त्र फेकून देण्यात आले. शस्त्र पुरवठादाराचा शोध सुरू आहे. या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारा अनमोल बिश्नोई सध्या परदेशात असून तो सहआरोपी असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले. पोलिस त्याच्याविरुद्ध लुकआउट परिपत्रक जारी करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT