Salman Khan
Salman Khan esakal
Premier

Salman Khan: घरावरील हल्ल्यानंतर सलमान दुबईला रवाना; ‘हे’ आहे कारण

priyanka kulkarni

Salman Khan: अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे (Bandra) येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर रविवारी (१४ एप्रिल) पहाटे पाच वाजता दोन दुचाकीस्वारांनी हल्ला केला. या बातमीने सगळीकडे खळबळ उडाली. सध्या या घटनेबाबत पोलीस तपास सुरु असून सलमानच्या घरावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. घरावरील हल्ल्याची बातमी ताजी असतानाच सलमान नुकताच परदेशात रवाना झाला आहे.

विरल भयानीने इंस्टाग्रामवर सलमान खानचा विमानतळावरील व्हिडीओ शेअर करत तो परदेशात गेला असल्याची बातमी शेअर केली. सलमान एका कार्यक्रमानिमित्ताने दुबईला गेला असून विरलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याचा बॉडीगार्ड शेरा त्याची आधी विमानतळावर वाट पाहताना दिसला आणि सलमान आल्यावर सगळेजण विमानतळावर गेल्याच पहायला मिळालं.

रविवारी झालेल्या गोळीबारानंतर सलमान त्यांच्या सुरक्षारक्षकांसह काही वेळासाठी बाहेर पडला होता पण थोड्यावेळात तो परतला होता. त्यानंतर इतक्या दिवसाने कामाच्या निमित्ताने तो परदेशात रवाना झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एका लक्झरी प्रोजेक्टच्या उद्घाटनासाठी तो दुबईला गेला आहे.

सलमानचा २०२५ मध्ये सिकंदर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सलमानने या सिनेमाची घोषणा केली होती. साजिद नादियाडवाला या सिनेमाची निर्मिती करत असून ए आर मुरुगादास या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. पुढच्या वर्षी रमजान ईदला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

दरम्यान, सलमानच्या घरावर हल्ला करणाऱ्या सागर पाल आणि विकी गुप्ता यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांची रवानगी कोठडीत केली आहे. हे हल्लेखोर फक्त सलमानच्या मुंबईतीलच नाही तर पनवेलमधील घरावरही पाळत ठेवून होते. सलमानकडून खंडणी घेण्याच्या उद्देशानेच त्याला धमकी देण्यासाठी हा हल्ला झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. सध्या पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत असून या प्रकरणी तिहार जेलमध्ये असलेल्या गँगस्टर लॉरेंस बिष्णोईची सुद्धा चौकशी केली जाणार असल्याची चर्चा आहे. तर सलमानच्या घरावरील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

T20 World Cup 2024: ICC ने केली सराव सामन्यांची घोषणा! टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध अन् कधी? पाहा संपूर्ण शेड्युल

SCROLL FOR NEXT