Salman Khan esakal
Premier

Salman Khan: आलिशान बंगल्याऐवजी अपार्टमेंटमध्ये का राहतो भाईजान? सलमाननं स्वत:च सांगितलं कारण

Salman Khan: एकीकडे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आलिशान बंगल्यामध्ये राहतात तर दुसऱ्याकडे सलमान गॅलेक्सी अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये राहतो.

priyanka kulkarni

Salman Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा सध्या चर्चेत आहे. सलमान खानच्या घराबाहेर दोन अज्ञान व्यक्तींनी गोळीबार केला. या घटनेनंतर खळबळ उडाली. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सलमाननं ईदनिमित्त त्याच्या घराच्या बाल्कनीत येऊन त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. अनेकवेळा सलमानचे चाहते गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर भाईजानची एक झलक पाहण्यासाठी गर्दी करत असतात. अशातच एका मुलाखतीमध्ये सलमाननं त्याच्या आणि गॅलेक्सी अपार्टमेंटच्या नत्याबद्दल सांगितलं.

एकीकडे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आलिशान बंगल्यामध्ये राहतात तर दुसऱ्याकडे सलमान गॅलेक्सी अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये राहतो. सलमान हा बंगल्यामध्ये राहण्याऐवजी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये का राहतो? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याबद्दल आता सलमाननं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतंं.

काय म्हणाला सलमान?

सलमाननं त्याच्या घराबद्दल मुलाखतीमध्ये सांगितलं, "आलिशान बंगल्यात राहण्यापेक्षा मला माझ्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये राहायला आवडते कारण माझे आईवडील माझ्या फ्लॅटच्या वरच्या फ्लॅटमध्ये राहतात. ती संपूर्ण बिल्डिंग एका मोठ्या कुटुंबासारखी आहे. आम्ही लहान असताना इमारतीतली सगळी मुलं खाली बागेत एकत्र खेळायची आणि कधी-कधी तिथे झोपायची. तेव्हा वेगळी घरं नव्हती, सगळी घरं आपलीच मानली जायची आणि आम्ही कधीही कोणाच्याही घरात खायला जायचो. मी अजूनही त्याच फ्लॅटमध्ये राहतो कारण त्या घराशी माझ्या असंख्य आठवणी जडल्या आहेत."

अरबाजनं शेअर केली पोस्ट

सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन व्यक्तींनी गोळीबार केला. या घटनेबद्दल सलमानचा भाऊ अरबाज खाननं एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, "अलीकडेच सलीम खान कुटुंबियांच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली. ही घटना अतिशय अस्वस्थ करणारी आहे. या धक्कादायक घटनेने आमचे कुटुंब हादरले आहे." सलमानच्या घराबाहेर सध्या सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT