Salman Khan And Salman Khan esakal
Premier

Salman Khan: "टाइगर जिंदा है और..."; घरावरील गोळीबार प्रकरणानंतर भाईजान पोहोचला लंडनला, यूकेच्या खासदारांकडून फोटो शेअर

Salman Khan: सलमान खान लंडनला पोहोचला आहे. लंडनमधील त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

priyanka kulkarni

Salman Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराच्या बाहेर 14 एप्रिल रोजी गोळीबार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सलमानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढली. तसेच सलमान हा या घटनेमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता या घटनेनंतर सलमान खान लंडनला पोहोचला आहे. लंडनमधील त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

यूकेच्या खासदारांकडून फोटो शेअर

यूकेमधील ब्रेंट नॉर्थ मतदारसंघातील खासदार बॅरी गार्डिनर (Barry Gardiner) यांची सलमान खाननं लंडनमध्ये भेट घेतली. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बॅरी गार्डिनर यांनी ट्विटरवर (एक्स) वेम्बली स्टेडियममधील सलमानसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सलमान आणि बॅरी गार्डन हे एकमेकांसोबत बोलताना दिसत आहेत.

खास कॅप्शन

बॅरी गार्डिनर यांनी सलमानसोबतचे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "टाइगर जिंदा है और लंदन में है.आज सलमान खानचे वेम्बली येथे स्वागत करताना आनंद होत आहे." बॅरी गार्डिनर यांनी शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सलमानचे आगामी चित्रपट

सलमाननं काही दिवसांपूर्वी त्याच्या सिकंदर या आगामी चित्रपटाची घोषणा केली. तसेच त्याचे किक 2, पठाण वर्सेज टायगर हे देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT