salman khan esakal
Premier

Salman khan: गॅलेक्सी अपार्टमेंट गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; महाराष्ट्र पोलीस लॉरेन्स बिश्नोईची करणार चौकशी

Salman khan: एनआयए आणि अनेक राज्यांच्या पोलिसांनी आतापर्यंत लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली आहे.

priyanka kulkarni

Salman khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या (Salman khan) घराबाहेर गोळीबार झाल्याच्या घटनेनं खळबळ माजवली. या घटनेची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई (Anmol Bishnoi) याने स्वीकारली. त्याने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. राष्ट्रीय तपास संस्थेनुसार (NIA) अनमोल बिश्नोई हा दहशतवादी संबंध असल्याच्या प्रकरणांमध्ये वाँटेड आहे. त्याचा भाऊ लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) सध्या तुरुंगात असूनही गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आता महाराष्ट्र पोलीस सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाबाबत लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करण्याच्या तयारीत आहेत.

दाऊद इब्राहिमप्रमाणेच लॉरेन्सही कुख्यात गुंड झाला आहे: एनआयए

एनआयए आणि अनेक राज्यांच्या पोलिसांनी आतापर्यंत लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली आहे. एनआयएने दाऊद इब्राहिम आणि लॉरेन्स बिश्नोई तुलना केली आणि याबाबत आरोपपत्रात नोंदवले. एनआयएच्या म्हणण्यानुसार दाऊद इब्राहिमप्रमाणेच लॉरेन्सही कुख्यात गुंड बनला. तो दहशतवादी संघटनांना मदत करू लागला. त्याच्या दहशतवादी सिंडिकेटने सतत खंडणी आणि खुनाचा प्रयत्न करून उत्तर भारतातील कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देण्यास सुरुवात केली. आता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारामुळे त्याच्या अडचणी वाढू शकतात.

पनवेलमध्ये राहात होते शूटर्स

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली.  सध्या पोलीस या घटनेतील आरोपी विक्की गुप्ता आणि सागर पाल यांची चौकशी करत आहेत. मुंबई पोलिसांनी सांगितले की, सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे शूटर 29 फेब्रुवारीला मुंबईत आले. मार्चमध्ये, ते पनवेलला गेले आणि त्यांनी त्यांचे आधार तपशील देऊन हरिग्राम गावात 3,500 रुपये दरमहा एक अपार्टमेंट भाड्याने घेतला. त्यांनी 10,000 रुपयांचे अॅडव्हान्स पेमेंट देखील केले.

विक्की गुप्ता आणि सागर पाल यांनी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या सागर पालने सलमानच्या घरावर गोळी झाडली, असं पोलिस तपासात समोर आले आहे. तर विकी गुप्ता हा दुचाकी चालवत होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडले, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT