Premier

Kargil Vijay Divas : LOC Kargil: पैशांसाठी सलमानने नाकारला होता हा देशभक्तीपर सिनेमा; SRK सह १९ सुपरस्टार्सनी दिला होता नकार..

Loc Kargil Movie Unknown Facts : आज कारगिल विजय दिवस आहे यानिमित्त जाणून घेऊया या युद्धावर आधारित असलेल्या LoC कारगिल सिनेमविषयी माहीत नसलेल्या गोष्टी.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक आणि निर्माते जे पी नड्डा यांची एलोसी कारगिल ही एक बहुचर्चित फिल्म. बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त लांबीची आणि सगळ्यात मोठी स्टारकास्ट असलेली ही फिल्म बॉक्स ऑफिसवर जरी अपयशी ठरली असली तरीही अनेकांज टेलिव्हिजन वर ही फिल्म पाहिली आहे.

बॉर्डर या सिनेमासाठी ओळखल्या जाणाऱ्या जे पी नड्डा यांनी या जेव्हा या सिनेमाची घोषणा केली तेव्हा अनेकांना हा सिनेमा पूर्ण होणार नाही अशी भीती होती. आज जाणून घेऊया या सिनेमविषयीच्या काही खास गोष्टी.

सिनेमाच्या नावावर मोठे विक्रम

तब्बल 4 तास 15 मिनिटांची फिल्म असलेल्या या सिनेमात 40 हुन अधिक बॉलिवूड मधील दिग्गज कलाकार होते. या सिनेमाच्या नावावर सगळ्यात जास्त स्टारकास्ट असलेली फिल्म आणि सगळ्यात जास्त लांबी असलेली फिल्म हे दोन विक्रम आहेत.

म्हणून, सलमानने दिला कारगिल सिनेमाला नकार

सिनेमाचे दिग्दर्शक जे पी नड्डा यांनी सलमानला या फिल्मसाठी विचारलं. हा सिनेमा त्याने कोणतीही फी न आकारता करावा अशी त्यांची इच्छा होती पण सलमानने त्यांना "तुम्ही डिस्ट्रिब्युटर्सना फिल्म फ्री मध्ये डिस्ट्रिब्युट करायला सांगणार आहात का ? नाही ना मग तुम्ही माझ्याकडून का अपेक्षा ठेवत आहात" असं उत्तर देत या सिनेमात काम करणं नाकारलं.

'या' बॉलिवूड कलाकारांनीही नाकारली फिल्म

शाहरुख खानची निवड पहिली संजय दत्तने साकारलेल्या भूमिकेसाठी करण्यात आली होती पण काही कारणास्तव त्याने नकार दिला. तर अक्षय कुमारने फार लहान रोल असल्याने हा सिनेमा नाकारला. या व्यतिरिक्त अनिल कपूर, तुषार कपूर

राहुल खन्‍ना, सुश्मिता सेन, डिनो मोरिया, अरबाज खान, जॅकी श्रॉफ, समीरा रेड्डी, मुकेश खन्ना, डॅनी, कुलभूषण खरबंदा इंदर कुमार, सलील अंकोला, सोनू सूद, फरदीन खान, बॉबी देओल यांनी हा सिनेमा नाकारला होता.

कारगिल सिनेमानंतर सतरा वर्षांनी कमबॅक

या सिनेमात साऊथचे सुपरस्टार नागार्जुन यांनी काम केलं होतं त्यानंतर त्यांनी सतरा वर्षं बॉलिवूड सिनेमामध्ये काम केलं नाही. नंतर ते ब्रम्हास्त्र या बॉलिवूड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आले.

खरी शस्त्र आणि दारूगोळ्याचा वापर

या सिनेमाच्या निर्मात्यांनी हा सिनेमा बनवताना खरी शस्त्र आणि दारूगोळ्याचा वापर केला होता. विशेष म्हणजे वादग्रस्त बोफोर्स एफ एच 77 सुद्धा या सिनेमात दाखवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT