Salman Khan: Sakal
Premier

Salman Khan: सलमान खानच्या घरावर हल्ला करताना वापरलेली बंदूक जप्त; "दहा राउंड फायरिंगचे आदेश देण्यात आले होते"

Salman Khan: सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी एक यश मिळालं आहे.

सकाळ वृत्तसेवा

Salman Khan

अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणाचा तपास अजूनही सुरु आहे. १४ एप्रिल २०२४ ला सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. गुजरात मधील भुज येथून या दोघांना अटक करण्यात आली आहे आणि आता पोलिसांनी तपासात या घटनेत वापरण्यात आलेल्या बंदुका शोधून काढल्या आहेत.

सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी एक यश मिळालं आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुरतमधील तापी नदीमधून बंदूक हस्तगत करण्यात आली आहे.

ही बंदूक गोळीबारात वापरण्यात आली असून त्यांना एक जिवंत काडतूसही सापडलं आहे. आरोपींनी त्यांच्या कबुलीजबाबात त्यांच्याकडे दोन बंदुका असल्याचं सांगितलं होतं आणि आता पोलीस दुसऱ्या बंदुकीचा शोध घेत आहेत. विरल भयणीने इंस्टाग्रामवर पोलिसांच्या या तपासकामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता यांनी दिलेल्या जबानीत त्यांच्याकडे दोन बंदुका होत्या आणि त्यांना दोन्ही बंदुकांमधून दहा राउंड फायर करायला सांगितल्याचं कबुल केलं आहे.

दोन्ही हल्लेखोरांना गोळीबार करायचं सांगितलं होत पण पकडले जाण्याच्या भीतीने एकचजण गोळीबार करू शकला. त्यानंतर दोघेही तिथून पळून गेले. पोलिसांनी याबाबत अनेक पुरावे गोळा केले असून आतापर्यंत दहा लोकांची जबानी या प्रकरणी घेण्यात आली आहे.

सलमानच्या घरावर हल्ला करणारे हल्लेखोर फक्त सलमानच्या मुंबईतीलच नाही तर पनवेलमधील घरावरही पाळत ठेवून होते. सलमानकडून खंडणी घेण्याच्या उद्देशानेच त्याला धमकी देण्यासाठी हा हल्ला झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत यांनी दिलेल्या मुलाखतीत पोलिसांची एक टीम बंदूक जप्त करण्यासाठी सुरतला पोहोचली असून एन्काउंटर स्पेशालिस्ट वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर दया नायक हे सुद्धा मुंबई क्राईम ब्रँचच्या टीमसोबत सुरतला गेले होते. यापुढचा तपास देखील दया नायक स्वतः सांभाळणार असल्याची चर्चा आहे. सुरत येथील तपासात स्थानिक गोताखोर आणि मच्छिमारांच्या मदतीने एक बंदूक जप्त करण्यात आली असून दुसऱ्या बंदुकीचा शोध अद्याप सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

China: तिबेटप्रमाणे भूतानची जमीन हडपण्याची चीनची तयारी; आता 'या' नव्या जागेवरही दावा

Pune News : पुण्यातील खड्ड्यांची समस्या कायम, 'पीएमसी रोड मित्र' ॲपवर १२७४ तक्रारी

IND vs UAE: कुलदीप यादवच्या फिरकीला शिवम दुबेची साथ अन् युएई संघ ६० धावांच्या आत ऑलआऊट

SCROLL FOR NEXT