atul parchure sanjay mishra esakal
Premier

धोंडू, अरे एवढी काय घाई होती.... अतुल परचुरेंच्या निधनाचा संजय मिश्रा यांना धक्का, तो व्हिडिओ शेअर करत म्हणाले-

Sanjay Mishra Emotional Post For Atul Parchure: लोकप्रिय मराठी अभिनेते अतुल परचुरे यांनी १४ ऑक्टोबर रोजी या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर अभिनेते संजय मिश्रा यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

Payal Naik

मराठी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेते अतुल परचुरे यांनी १४ ऑक्टोबर २०२४ रोजी या जगाचा निरोप घेतला. गेली दोन वर्ष ते कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी दोन हात करत होते. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर ते बरेही झाले होते. मात्र पुन्हा एकदा त्यांचा आजार बळावला. आणि शेवटी अतुल यांचं निधन झालं. अतुल यांच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. काळ आपल्यात असलेला माणूस आज अचानक जग सोडून गेला हे अजूनही अनेकांना खोटं असल्यासारखं वाटत आहे. आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर आजारावर मात करणारा हा अभिनेता अखेर हरला आणि आपल्याला सोडून गेला त्यामुळे कलाकारही पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेते संजय मिश्रा यांनीही या हरहुन्नरी कलाकारासाठी पोस्ट केली आहे.

अतुल हे मराठीप्रमाणे बॉलिवूडमध्येही सक्रीय असत. बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते संजय मिश्रा यांच्यासोबतचा त्यांनी 'ऑल द बेस्ट' या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटातील त्यांचा एक सीन प्रचंड गाजला होता जेव्हा संजय आणि अतुल दोघे एकमेकांशी बोलतात आणि अतुल यांनी अडचण सांगितल्यावर संजय त्यांना जस्ट चिल असं म्हणतात. आता हाच सीन आठवून संजय यांनी मित्रासाठी पोस्ट केली आहे. संजय यांनी ट्विटरवर एक ट्वीट करत लिहिलं, 'धोंडू अरे एवढी काय घाई होती तुला जायची, आता मी जस्ट चिल कुणाला म्हणू' यासोबत त्यांनी एक हात जोडलेला ईमोजी शेअर केला आहे. आणि त्यांचा चित्रपटातील जस्ट चिलवाला व्हिडिओ शेअर केला आहे. यावर नेटकरीही भावुक झाले आहेत.

अतुल परचुरे यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी ११ च्या सुमारास शिवाजी पार्क स्मशानभूमीवर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने आता सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : भारत अन् श्रीलंकेत संरक्षण क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT