Sanjay Raut On Worli hit & run case  Esakal
Premier

Worli Hit & Run Case : "आता कुठे गेले टाळकुटेपणा करणारे मराठी कलाकार ?" ; वरळी हिट अँड रन केसवर संजय राऊतांचा मराठी सिनेविश्वाला संतप्त सवाल

Sanjay Raut expressed his anger about worli hit & run case : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वरळी हिट अँड रन केसबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना मराठी सिनेविश्वातील कलाकारांच्या उदासीनतेवरही सवाल केला.

सकाळ डिजिटल टीम

Sanjay Raut : शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांच्या २४ वर्षीय मुलाने रविवारी ७ जुलैला बेदरकारपणे गाडी चालवत कावेरी नाखवा या महिलेचा जीव घेतला. पुण्यातील पोर्शे प्रकरण अजून ताजं असताना मुंबईतील वरळी येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रकरणामुळे सरकारवर चहुबाजूने टीका होतेय आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही सरकार आणि मराठी कलाकारांवर चांगलंच तोंडसुख घेतलंय.

आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना संजय यांनी सरकार आणि मराठी कलाकारांवर टीका केली. ते म्हणाले,"महाराष्ट्रात मिंधे सरकार आहे. गुन्हेगारी स्वरुपातून निर्माण झालेले हे सरकार असून विधानसभेतील अनेक गुन्हेगारांना या सरकारने संरक्षण दिलं आहे. ईडी, आर्थिक गुन्हे शाखा, प्राप्तिकर विभाग, सीबीआय यांनी ज्यांना गुन्हेगार ठरविले, असे अनेक लोक सरकारमध्ये आहेत. त्यामुळेच सरकारची मानसिकता गुन्हेगारी स्वरुपाची आहे. गुन्हेगारांना संरक्षण द्यायचं आणि आपल्यात सामील करून घ्यायचं हे हे सरकार करतं. वरळी हिट अँड रन प्रकरणात नेमकं हेच झालं आहे. श्रीमती नाखवा यांना ज्या प्रकारे वरळीच्या रस्त्यावर वारंवार गाडीखाली आणून चिरडण्याचा प्रकार झाला, हा एखादा नशेमध्ये असलेला नराधम आणि पैशांची व सत्तेची नशा असलेला व्यक्तीच करू शकतो. एका मराठी महिलेची ज्या प्रकारे रस्त्यावर निर्घृण हत्या करण्यात आली आणि मुंबई पोलिसांना तीन दिवस आरोपी सापडत नाही, हे कुणाला खरं वाटेल का? त्याच्या शरीरातील नशेचा अंमल वैद्यकीय तपासणीत येऊ नये, यासाठी त्याला तीन दिवस लपवून ठेवण्यात आलं."

पुढे ते म्हणाले कि,"या मुलाचे वडीलही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून आता ते समोर आलं आहे कि ते मुलाला सांगत होते कि, तू पळून जा आणि ड्रायव्हरला ड्रायव्हिंग सीटवर बसव यातून त्यांची गुन्हेगारी वृत्ती समोर आलीये. या मुलाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, पोलिसांनी तशी मागणी केली पाहिजे आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा अशी मी मागणी करतो."

मराठी कलाकारांवर आरोप करताना ते म्हणाले कि,"यातील पीडित महिला आणि त्यांचं कुटूंब मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांचे नातेवाईक आहेत. मी आता वाचलं त्यांच्याविषयी. आता कुठे गेली मराठी सिनेसृष्टी? एरवी आपली मते व्यक्त करणारे किंवा सामाजिक कार्यात दिसणारे कलाकार कुठे गेले? त्यांनी बोलले पाहीजे. मराठी सिनेसृष्टी टाळकुटेपणा करत आहे. सिनेसृष्टीतील आपल्या एका सहकाऱ्याचे नातेवाईक अशाप्रकारे रस्त्यावर चिरडल्यानंतर तुम्ही मूग गिळून गप्प बसता. कसला मराठीपणा आहे तुमच्यामध्ये ?" असा सवालही त्यांनी मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांना विचारला.

या अपघातामध्ये मृत पावलेल्या कावेरी नाखवा या अभिनेते जयवंत वाडकर यांच्या सख्खी पुतणी नात्याने लागत होत्या. त्यांच्या या अपघाती मृत्यूचा धक्का जयवंत आणि त्यांच्या कुटूंबाला बसला असून त्यांनी महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या भावना व्यक्त करत आरोपीला लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली होती.

या घटनेतील आरोपी मिहीर शाह याला पोलिसांनी विरार येथून अटक केली असून त्याचे वडील राजेश शाह यांना शिवसेना शिंदे गटातून हाकलण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT