Sankarshan Karhade esakal
Premier

Sankarshan Karhade: "ती सभा, ती गर्दी, तो आवाज, ती घोषणा..."; सध्याच्या राजकीय परिस्थितीवर संकर्षण कऱ्हाडेची खास कविता, व्हिडीओ एकदा बघाच

Sankarshan Karhade: सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आधारित असणारी कविता संकर्षणनं लिहिली आहे. ही कविता नुकतीच त्यानं एका कार्यक्रमात सादर केली.

priyanka kulkarni

Sankarshan Karhade: मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा (Sankarshan Karhade) चाहता वर्ग मोठा आहे. संकर्षण हा नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. संकर्षण हा विविध विषयांवर कविता देखील लिहितो. तो कार्यक्रमांमध्ये त्या कविता सादर करतो. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आधारित असणारी कविता देखील संकर्षणनं लिहिली आहे. ही कविता नुकतीच त्यानं एका कार्यक्रमात सादर केली.

संकर्षणच्या कवितेनं वेधलं लक्ष

संकर्षणनं एका कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संकर्षण हा राजकीय परिस्थितीवर आधारित असणारी त्यानं लिहिलेली कविता सादर करताना दिसत आहे.

संकर्षणनं लिहिलेली ही कविता एका कुटुंबावर आधारित होती. या कुटुंबातील आजोबांनी त्या कुटुंबातील सदस्यांची मतं वाया गेल्यानं दु:ख व्यक्त करत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं, असं या कवितेत मांडण्यात आलं आहे.

संकर्षणनं शेअर केला व्हिडीओ

संकर्षणनं त्याच्या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "नमस्कार, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काही लिहिण्याचा मनापासून प्रयत्नं केला आणि प्रेक्षकांनी काल तो प्रयत्नं अगदी मनापासून स्विकारला… तुम्हीही ऐका , पहा आणि मनापासून सांगा की, तुमच्याही मनांत हेच आहे का?"

पाहा व्हिडीओ:

गेल्या वर्षी संकर्षणचा तीन अडकून सीताराम हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. संकर्षणनं वेडिंग शिनेमा, खोपा, नागपूर अधिवेशन या चित्रपटात देखील काम केलं आहे. तसेच संकर्षणच्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

सध्या संकर्षण आणि अभिनेत्री स्पृहा जोशी हे त्यांच्या संकर्षण via स्पृहा या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या कार्यक्रमात ते विविध गाणी आणि कविता सादर करत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; जळगावच्या जयदीप नेमाडे यांचा दुर्दैवी अंत

Iran Execution : इराणने मोसादच्या गुप्तहेराला दिली फाशी, इस्त्रायलला संवेदनशील लष्करी माहिती पुरवल्याचा आरोप

Amit Shah Kolhapur visit cancelled : अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने हुबळीतून दिल्लीकडे रवाना

Latest Marathi News Update : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू

Asian Games 2026: श्रेयस अय्यरच्या संघाला जपानला जाण्यापूर्वी धक्का; BCCI, IOA ची पळापळ, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT