Sankarshan Karhade Esakal
Premier

Sankarshan Karhade : " कऱ्हाडे, तुझं ऱ्हस्वं दीर्घ कधी सुधारणार ? " असा प्रश्न विचारणाऱ्या मराठीच्या बाईंची संकर्षणला शाबासकी ; अभिनेता म्हणाला...

Sankarshan Karhade Post : अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या शाळेतील मराठीच्या बाईंनी त्याची भेट घेत त्याचं खास कौतुक केलं आणि त्याला भेट दिली. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Sankarshan Karhade : अभिनेता संकर्षण कऱ्हाडे त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या लिखाणासाठीही प्रसिद्ध आहे. संकर्षण हा उत्तम लेखक आणि कवी आहे हे सगळ्यांनाच माहितीये. तो सध्या संकर्षण व्हाया स्पृहा नावाचा कवितांचा कार्यक्रमही करतो. त्याचा हा कार्यक्रम बराच चर्चेत असून नुकताच त्याच्या शाळेतील बाईंनी या कार्यक्रमाला हजेरी लावत त्याचं कौतुक केलं.

संकर्षणच्या शाळेतील मराठीच्या बाईंनी त्याच्या या कार्यक्रमाला हजेरी लावत त्याच कौतुक केलं. सोबतच त्याला काह पैसे बक्षीस म्हणूनही दिले. सोशल मीडियावर संकर्षणने ही पोस्ट शेअर करत याबद्दलचा आनंद व्यक्त केला. याबरोबरच त्याची मराठी भाषा शाळेत असताना खूप वाईट होती ती बाईंनी घेतलेल्या मेहनतीमुळेच सुधारली हे नमूद केलं.

संकर्षणची पोस्ट

"माझ्या शाळेच्या “मराठीच्या बाईंनी मला बक्षीस दिलं हो…”😭
माझ्या परभणीतल्या शाळेत मला मराठी शिकवायला ह्याच जपे बाई होत्या … नेहमि मला वर्गात ऊठवायच्या आणि
“कऱ्हाडे ; धडा वाच … कऱ्हाडे , अक्षर अतीशय घाण आहे…,
तुझं ऱ्हस्वं दीर्घ कधी सूधरणार …??? असं म्हणायच्या…
पोरांना शिकायचा कंटाळा आला (जो नेहमिच आलेला असायचा) कि, “कऱ्हाडे … गाणं म्हण” असं म्हणायच्या… आज त्याच माझ्या मराठीच्या बाई कवितांच्या कार्यक्रमाला अमेरिकेत आल्या आणि मला कवितांसांठी बक्षीस दिलं …😭😭😭 मला खूप भरून आलं…
प्रेक्षकांना भेटतांना तसा मी शांत ऊभा असतो पण , बाई भेटायला आल्या आणि मला खरंच भिती वाटली…
माझी आज शब्दांशी “जर मैत्री असेल” … तर ती बाईंनीच करून दिलीये…
हे नातं तेंव्हाचं आहे जेंव्हा शाळेतल्या बाईंना “बाईच” म्हणायचो..
समजा शाळेतले गुरूजी … भाजी मंडईत जरी दिसले तरी भिती वाटायची… आणि घाबरून चालत्या सायकल वरून ऊडी मारायचो…

अभ्यासात मी कधीच हूशार नव्हतो त्यामुळे तेंव्हा बक्षीस मिळवून घरी पळत जाउन आई बाबांना ते आनंदाने सांगण्याचं सुख कधी मिळालं नाही… पण आज सांगतो आई बाबांना , बायको आणि माझ्या छोट्या मुलांनाही कि ; “माझ्या बाईंनी मला बक्षीस दिलं” "

संकर्षणच्या या पोस्टचा सगळीकडे कौतुक होतंय. त्याच्या बाईंनी केलेलं कौतुक पाहून त्याच्या चाहत्यांनाही खूप आनंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu crisis updates: जम्मूत परिस्थिती बिकट, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

CM Himanta Biswa Sarma: मुख्यमंत्री सरमा यांनी धुबरी जिल्ह्यासाठी दिले ‘शूट अ‍ॅट साइट’चे ऑर्डर!

Hadapsar News : ओंकार जाधव याने वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी माउंट किलीमांजारो शिखर केले सर

Sachin Tendulkar: जो रुट मास्टर-ब्लास्टरचा विश्वविक्रम मोडण्याच्या जवळ; सचिन म्हणतोय, 'तो अजूनही...'

Ganeshotsav: गणपती आगमन-विसर्जनासाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील १२ पूल धोकादायक, महापालिकेचं आवाहन

SCROLL FOR NEXT