Sankarshan Karhade esakal
Premier

Sankarshan Karhade: "संकर्षण दादाच्या पाया पड", बॅकस्टेज आर्टिस्टच्या कृतीने संकर्षण भारावला

Sankarshan Karhade: अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) कायमच चर्चेत असतो. यासोबतच त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात.

priyanka kulkarni

Sankarshan Karhade: कधी कविता तर कधी सूत्रसंचालन तर कधी लेखन तर कधी अभिनय अशा अनेक कलागुणांमुळे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) कायमच चर्चेत असतो. यासोबतच त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. रोजच्या जगण्यातील छोट्या छोट्या संकर्षण त्याच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो.

नुकतंच संकर्षणने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. संकर्षण काम करत असलेल्या नाटकात बॅकस्टेजला काम करणाऱ्या कलाकाराने केलेल्या कृतीने संकर्षण भावूक झाला आणि त्याने त्यांच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या. तो म्हणतो,"“नाटकातला संसार”

आज आमच्या #तूम्हणशीलतसं आणि #नियमवअटीलागू नाटकाला बॅकस्टेज चं काम करणारा अक्षय पवार नवा नवा संसार सुरू करून भेटायला आला…. बायकोची ओळख करुन दिली आणि म्हणाला “सोनाली , दादाला नमस्कार कर” ईतकं गोड वाटलं ….

नाटक हे तसं अनिश्चीततेचं माध्यम …. पण नेटाने, चिकाटिने , सातत्याने नाटक केलं तर नाटक खूप काही देतं …. आज बॅकस्टेज करणाऱ्या ह्या मुलाने आयुष्यातलं मोठं पाऊल नाटकाच्या जीवावर ऊचललं …. संसार सुरू केला…. म्हणून प्रत्येक प्रयोग महत्वाचा... कारण त्या एका एका प्रयोगावर , एका एका कुटुंबाच्या घरी संसार सुरू असतो…. असे अनेक संसार सुखी करण्यासाठी “नाटक” फार फार महत्वाचं …. ह्या दोघांना खूप शुभेच्छा "

अक्षय आणि सोनालीच्या कृतीने संकर्षण भारावून गेला. अनेकांनी संकर्षणने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत त्या तिघांचंही कौतुक केलं. "संकर्षण तू खूप संवेदनशील कलाकार आहेस. " असं अनेकांनी म्हंटल. तर काहींनी "आपण प्रामाणिकपणे नाटक करत राहतो, रंगदेवता आपल्या या प्रामाणिकपणेचे फळ नक्की आपल्याला देते..." असं म्हणत तिघांचंही कौतुक केलं.

सध्या संकर्षणची नियम व अटी लागू आणि तू म्हणशील तसं ही दोन्ही नाटकं रंगभूमीवर सुपरहिट सुरु आहेत. या नाटकातील त्याच्या अभिनयाचं अनेकांनी वेगवेगळ्या माध्यमांमार्फत कौतुक केलं आहे. या सोबतच त्याच्या सोशल मीडिया पोस्टही चाहते आवर्जून वाचतात आणि त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT