Sankarshan Karhale esakal
Premier

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Sankarshan Karhale: राजकीय परिस्थितीवर आधारित असणारी कविता संकर्षणनं एका कार्यक्रमात सादर केली. या कवितेचा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केला.

priyanka kulkarni

Sankarshan Karhale: अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या एका कवितेमुळे चर्चेत आहे. राजकीय परिस्थितीवर आधारित असणारी कविता संकर्षणनं एका कार्यक्रमात सादर केली. या कवितेचा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केला. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. अशातच संकर्षणनं एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत कविता सादर केल्यानंतर आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.

संकर्षण म्हणतो, "माझा फोन खूप श्रीमंत झाला"

संकर्षणनं एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं,"हा विषय जरा संवेदनशील आहे. त्यामुळे कविता सादर करताना थोडी धाकधूक होती.मी नागरीक म्हणून हे मांडलं आणि ते प्रेक्षकांनी स्विकारली."

पुढे संकर्षण म्हणाला, "गेल्या दोन दिवसांत माझा फोन खूप श्रीमंत झालाय, असं मला वाटतंय. मला खूप जणांचे फोन आले. ही मोठी माणसं खरंच खूप मोठी असतात, हे मला कळालं, आपण उगाच हेवेदावे करून चिखल करून घेतो. मला राज ठाकरे साहेबांचा, उद्धव ठाकरे साहेबांचा, विनोद तावडे साहेबांचा फोन येऊन गेला. यांचे आवाज मी स्वत:च्या कानांनी ऐकलेत. शरद पवार साहेब माझ्याशी स्वत: बोलले नाहीत पण, त्यांच्या निकटवर्तीयांनी मला फोन केला होता. ते मला म्हणाले की, मी तुमच्या सगळ्या कविता साहेबांना ऐकवतो. ही कविता सुद्धा मी त्यांना पाठवली आहे. त्यांना ही कविता खूप आवडली. या निवडणुका झाल्यावर तुम्ही एकदा त्यांना सगळ्या कविता ऐकवा."

राज ठाकरेंनी संकर्षणला घरी भेटायला बोलवलं

राज ठाकरेंनी संकर्षणला त्यांच्या घरी बोलावले होते. याबद्दल संकर्षण म्हणाला,"राज ठाकरेंनी मला फोन करून भेटायला घरी बोलावलं. त्यांनी अकरा वाजताची वेळ मला दिली होती. मी सकाळी साडेसात वाजता मिरारोडवरून निघालो. मी नऊ वाजता शिवाजी पार्क परिसरात पोहोचलो आणि आकराच्या आधी मी तिथेच अडीच तास फेऱ्या मारत होतो. मी त्यांच्या घरात गेलो आणि माझ्या घरच्या ग्रुपवर मेसेज टाकला मी आत येऊन बसलोय. तेव्हापासून आमचे बाबा सारखे बीपीच चेक करत होते. हे सगळं मी जाऊन राज साहेबांना सांगितलं. ते देखील मिश्किल आहेत ते म्हणाले, 'घरच्यांना सांगा सुखरुप निघालोय' मी राज साहेबांसोबत खूप गप्पा मारल्या"

ऐका संकर्षणची कविता:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : मोटारसायकल चोराला अटक, तीन बाईक्स जप्त

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

Mahadevi Elephant : कोल्हापूरकरांच्या लढ्याला येणार यश? नांदणी मठाच्या 'महादेवी'साठी उच्चस्तरीय समिती घेणार निर्णय

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; ब्रह्मपुरी तालुक्यातील लाखापूर येथील घटना

SCROLL FOR NEXT