khushboo tawade  esakal
Premier

'सारं काही तिच्यासाठी' फेम खुशबू तावडे दुसऱ्यांदा झाली आई; दिला गोंडस बाळाला जन्म; मुलगा की मुलगी?

Khushboo Tawde and Sangram Salvi Became Parents Second Time: अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी यांनी नुकतीच चाहत्यांना खुशखबर दिली आहे. त्यांना मुलगी झाली आहे.

Payal Naik

लोकप्रिय मराठी अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी दुसऱ्यांदा आई- बाबा झाले आहेत. त्यांना कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. आज २ ऑक्टोबर रोजी खुशबू आणि संग्राम यांनी त्यांच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत केलंय. संग्राम आणि खुशबू यांनी एक पोस्ट करत चाहत्यांसोबत शेअर केली आहे. संग्राम आणि खुशबू हे मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय कपल आहेत. आता त्यांच्या आनंदात आणखी भर पडली आहे. त्यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. त्यांना एक मुलगा आहे ज्याचं नाव राघव आहे. आता तीन वर्षांनी अभिनेत्री पुन्हा आई झाली आहे.

खुशबूने महिन्याभरापूर्वीच आपल्या गरोदरपणाची घोषणा केली होती. त्यांनी एक रील शेअर करत याबद्दल सांगितलं होतं. तिने ऑगस्ट महिन्यात ही गुडन्यूज दिली होती. मात्र तेव्हाती 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत काम करत होती. त्यानंतर तिने मालिकेचा निरोप घेतला. जवळपास सातव्या महिन्यांपर्यंत ती मालिकेत काम करत होती. शेवटी तिने सोशल मीडियावर याबद्दल माहिती देत मालिकेचा निरोप घेतला. त्यानंतर मालिकेत तिची जागा पल्लवी वैद्य हिने घेतली होती. तर संग्राम हा 'देवयानी' मालिकेतून घराघरात पोहोचला. सध्या तो 'वेड लागलं प्रेमाचं' या मालिकेत दिसतोय. आता त्यांच्या घरात एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

संग्राम आणि खुशबू यांनी २०१८ साली लग्नगाठ बांधली. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला होता. आता त्यांच्या दुसऱ्या बाळाचा जन्म झाला आहे. त्यांचं चौकोनी कुटूंब पूर्ण झालं. चाहतेही त्यांच्यावर आता शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

Property Tax : नियमीत करदात्यांना २५ टक्के सवलत द्या; अभय योजनेतून तीन दिवसात १५.२७ कोटी वसूल

Pune Water Supply Close : पुणे शहराच्या बहुतांश भागाचा पाणी पुरवठा गुरूवारी राहणार बंद

Deglur Nagarparishad Election : नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवारी अर्ज; तर नगरसेवकपदासाठी १८९ जणांचा अर्ज

SCROLL FOR NEXT