sarabhai fame actress joins bjp 
Premier

Sarabhai Fame Actress Join BJP: 'साराभाई 'फेम अभिनेत्रीने हाती घेतलं कमळ! विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

Sarabhai fame actress joins BJP : साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेल्या एका अभिनेत्रीने आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

सकाळ डिजिटल टीम

Sarabhai fame actress joins BJP : 'साराभाई व्हर्सेस साराभाई' या मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेल्या रुपाली गांगुली (Rupali Ganguly) अभिनेत्रीने आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षनेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत तिने आज भाजप (Bhartiya Janta Party) मध्ये प्रवेश केला. तिच्यासोबत अमेय जोशी यांनीही भाजपा पक्षात प्रवेश केला.

रुपाली ही सध्या अनुपमा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत असून स्टार प्लसवरील तिची ही मालिका खूप चर्चेत आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तिने राजकारणात केलेला प्रवेशाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

"मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खूप मोठी चाहती आहे. आपल्या देशातील विकासाचं पर्व पाहिल्यावर मलाही वाटलं यात मी सहभागी झालं पाहिजे म्हणून मी हा पक्षप्रवेश केला. मोदींनी दिलेल्या मंत्रानुसार मी काम करणार आहे." असं ती पक्षात प्रवेश करताना म्हणाली.

भारतीय जनता पक्षाचे सचिव असलेले नेते विनोद तावडे यांनीही यावेळी काँग्रेस आणि इतर विरोधकांवर टीका केली. "विरोधी पक्ष आपल्या प्रचारात खोटं पसरवत आहे. 'मत जिहाद' करण्यापर्यंत काँग्रेस आता पोहोचली आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. या दोन्ही प्रवेशाने पक्षाला बळ मिळेल. दोघांचंही भाजपमध्ये स्वागत. " असं ते यावेळी म्हणाले.

रुपालीची कारकीर्द

रुपाली ही बंगाली कुटूंबातून आली असून तिचे वडील अनिल गांगुली हे दिग्दर्शक होते तर तिचा भाऊ विजय हा नृत्यदिग्दर्शक आहे. 'साहेब' या सिनेमातून रुपालीने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत दोन सिनेमांमध्ये काम केलं. तर सुकन्या या मालिकेतून तिने टेलिव्हिजनविश्वात पदार्पण केलं. पण तिला ओळख मिळाली ती स्टार प्लसवरील संजीवनी या मालिकेतून. या मालिकेत तिने डॉ. सिमरन ही खलनायकी ढंगाची भूमिका साकारली होती. तिची भूमिका खूप गाजली. तर तिची भाभी ही मालिकाही लोकप्रिय ठरली.

काही काळाने नेहमीच्या सास-बहू प्रकारातील मालिकांमधून बाहेर पडत तिने साराभाई व्हर्सेस साराभाई या सिटकॉम प्रकारातील मालिकेत तिने काम केलं. या मालिकेत तिने साकारलेली मोनिशा साराभाई ही भूमिका खूप गाजली आणि आता ती स्टार प्लसवरील अनुपमा या मालिकेत काम करतेय. ती साकारत अनुपमा या मध्यवर्गीय गृहिणीची आणि आईची भूमिका खूप गाजतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT