Manoj Bajpayee On Gangs Of Wasseypur 
Premier

Gangs Of Wasseypur : मीम म्हणून व्हायरल झालेला गँग्स ऑफ वासेपूरमधील हा सीन स्क्रिप्टमध्येच नव्हता , मनोज वाजपेयींनी केला खुलासा

Manoj Bajpayee Revealed story behind Saradar Khan & Durga Viral Scene BTS Story : अभिनेते मनोज वाजपेयी यांनी गँग्स ऑफ वासेपूर सिनेमातील सरदार खान आणि दुर्गा यांच्यातील व्हायरल झालेल्या सीनमागची मजेशीर गोष्ट शेअर केली.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood Entertainment News : 2012 साली रिलीज झालेली गँग्स ऑफ वासेपूर सिनेमा आजही प्रेक्षकांचा लाडका आहे. या सिनेमातील सगळ्या भूमिका, सगळी पात्र आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. या सिनेमातील अनेक मिम्स बनले असून हे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल आहेत. यातीलच एक गाजलेला सीन म्हणजे सरदार खान (मनोज वाजपेयी) आणि दुर्गा (रीमा) यांच्यातील रोमँटिक सीन.

काय आहे तो सीन ?

गँग्स ऑफ वासेपूर या सिनेमात मनोज वाजपेयी यांनी सरदार खान ही भूमिका साकारली होती आणि अभिनेता रीमा दुर्गा या भूमिकेत दिसल्या होत्या. लग्न झालेलं असूनही सरदार खान दुर्गाच्या प्रेमात पडतो आणि त्यांचं प्रेमप्रकरण या सिनेमात दाखवलं गेलं होतं. आणि तो व्हायरल झालेला सीन असा आहे कि, दुर्गा कपडे धुवत असते. सरदार खान मागून येतो आणि तिच्याजवळ बसून तिला पाहू लागतो. त्यामुळे दुर्गा लाजत असते आणि सरदार खान तिची नक्कल करत असतो आणि नंतर म्हणतो कि, "तुला येणाऱ्या फिटचा इलाज माझ्याकडे आहे."

मनोज वाजपेयींचा खुलासा

हा सिनेमा रिलीज झाल्यावर काही काळाने हा सीन सोशल मीडियावर मिम बनला. एका मुलाखतीमध्ये मनोज वाजपेयी यांनी या सीनमागचा किस्सा शेअर केला. ते म्हणाले,"या सिनेमातील बरेच सीन्स आम्ही इम्प्रोवाईज केले आहेत. दुर्गा कपडे धुतानाचा सीनही इम्प्रोवाईजच केलेला होता. नंतर तो लोकांनी मीम म्हणून वापरला. सिनेमातील अनेक सीन्सचे मीम आता बनवले जातात पण या सिनेमातील ज्या ज्या सीन्सचे मीम बनवले आहेत त्यातील बहुतेक इम्प्रोवाईज सीन्स आहेत जे आम्ही वर्कशॉप दरम्यान केले होते आणि नंतर ते फिल्ममध्ये चित्रित केले गेले. अनुराग असाच दिग्दर्शक आहे. सिनेमातील कलाकार आणि टेक्निशियन मंडळींचं तो ऐकतो आणि त्यानुसार तो स्क्रिप्टमध्येही बदल करतो. बऱ्याचदा स्क्रिप्ट पुन्हा लिहिलंही जातं. "

सिनेमाविषयी अधिक माहिती

अनुराग कश्यप दिग्दर्शित हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. विकी कौशलने या सिनेमासाठी असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT