Sarfira Trailer Out sakal
Premier

Sarfira: खिशात एक रुपया असताना गगन भरारी घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या माणसाची गोष्ट; अक्षयच्या 'सरफिरा'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

Akshay Kumar: सरफिरा या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षयनं या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत दिसत आहे.

priyanka kulkarni

Sarfira Trailer Out: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचे (Akshay Kumar) काही चित्रपट बॅक-टू-बॅक फ्लॉप ठरले. पण खिलाडी अक्षय हा हार न मानता आता पुन्हा एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयचा सरफिरा हा चित्रपट जुलै महिन्यात रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयनं त्याच्या या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. सरफिरा या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षयनं या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत दिसत आहे.

'सरफिरा'चा ट्रेलर रिलीज

अक्षयनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन 'सरफिरा' या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं, "स्वप्नं ती नसतात जी तुम्ही झोपेत पाहतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत, अशीच एक स्वप्न कथा आहे सरफिरा,सरफिरा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज"

डायलॉग्सनं वेधलं लक्ष

सरफिरा चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला विसकटलेले केस आणि मळलेले कपडे अशा लूकमध्ये अक्षय दिसतो.  "मेरा नाम वीर म्हात्रे है और मैं जरेंदेश्वर के पास एक गांव से हूं." हा अक्षय कुमारचा डायलॉग ट्रेलरमध्ये ऐकू येतो. त्यानंतर ट्रेलरमध्ये राधिका मदान दिसते. राधिकाला अक्षय म्हणतो, "आइडिया है.. बिझनेस आइडिया..." त्यानंतर अक्षय त्याच्या बिझनेस आयडियावर काम करण्यास सुरुवात करतो.

ट्रेलरमध्ये परेश रावल हे परेश गोस्वामी या भूमिकेत दिसत आहेत. ट्रेलरमध्ये पुढे दिसते की, खिशात एक रुपया असताना आकाशात उड्डाण करण्याचे सर्वसामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अक्षय धडपड करतो.

पाहा ट्रेलर

कधी रिलीज होणार सरफिरा?

सरफिरा हा चित्रपट 12 जुलै 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट'सोरारई पोटरु' या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. प्रेक्षक अक्षयच्या या आगामी चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT