SAVLYACHI JANU SAWALI SERIAL SHOOTING
ESAKAL
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडीच्या असतात. या मालिका कायमस्वरूपी प्रेक्षकांच्या मनावर कोरल्या जातात. मालिकेची नावं, त्यातील पात्र यामुळे मालिका प्रेक्षकांच्या अगदी जवळच्या होतात. मालिकेतील पात्र बदललं तरी प्रेक्षक त्याबद्दल विचारपूस करतात. काही प्रेक्षकांना तर या मालिका खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना वाटतात. मात्र मालिकांमध्ये जे दाखवलं जातं ते खोटं असतं. मालिकांचं शूटिंग कसं होतं तुम्हाला ठाऊक आहे का? आता 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेतील एक सीन शूट करतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
'सावळ्याची जणू सावली' या मालिकेत सावली प्रत्येक अडथळ्यांचा सामना करत आपल्या कुटुंबाला वाचवायचा प्रयत्न करताना दिसते. त्यातच काही दिवसांपूर्वी अमृता वहिनींचा अपघात होताना दाखवण्यात आलेला. या अपघातात त्या त्यांचं बाळ गमावतात. हा सीन कसा शूट झाला होता माहितीये का? कोठारे व्हिजनच्या इंस्टाग्राम पेजवर त्यांच्या मालिकांचे बिहाइंड द सीन शेअर करण्यात येतात. त्यातच त्या सिनचं शूटिंगदेखील दाखवण्यात आलंय.
या व्हिडिओमध्ये सुरुवातीला एक व्यक्ती दिसतो तो अमृताला रस्त्यावर झोपायला सांगतो. ती झोपल्यानंतर ती स्वतःहून गोल फिरते. तिच्या डोक्यावर रक्त लागलेलं आहे. ती गोल फिरताच बाजूने गाडी जाण्याचा शॉट घेतला जातो. त्यात तिथे शेजारी असलेला रिक्षावाला तिची मदत करायला जातो. तेवढ्यात सावली तिथे पोहोचते. ती नंतर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी गाडी शोधायला जाते. त्यानंतर अमृता स्वतः उठून उभी राहते. शिवाय तिला उठवण्यासाठी सेटवरची लोकं देखील येतात. अशा प्रकरणे हे शूटिंग पार पडतं.
मालिकेच्या शूटिंगचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. त्यामुळे तुम्हाला अजूनही असं वाटत असेल की मालिकेत घडणाऱ्या घटना खऱ्या असतात तर तसं नसतं. 'सावल्याची जणू सावली' या मालिकेची वेळ आता लवकरच बदलण्यात येतेय. नव्या मालिकेमुळे सावलीची मालिका नव्या वेळेत दाखवण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.