shahrukh khan on team india  sakal
Premier

Shah Rukh Khan: अरे हे किती भारी आहे... मरीनवरील परेड पाहून किंग खान भारावला; टीम इंडियासाठी केलेली पोस्ट चर्चेत

Shah Rukh Khan Post For Team India: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने टीम इंडियासाठी खास पोस्ट केली आहे.

Payal Naik

भारतीय संघाने टी २०मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत ट्रॉफी आपल्या नावे केली. त्यानंतर देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. २९ जून रोजी बार्बाडोस येथे झालेल्या सामन्यानंतर सगळेच भारतीय संघाच्या मायदेशी परतण्याची वाट पाहत होते. परंतु, बार्बाडोस येथे आलेल्या वादळामुळे २ दिवस संपूर्ण संघ तिथेच अडकून पडला होता. अखेर ४ जुलै रोजी सगळे खेळाडू भारतात परतले. त्यांच्या स्वागतासाठी सगळे मुंबईकडे वानखेडे स्टेडीयम परिसरात मरीन ड्राइव्ह येथे जमले होते. इथून त्यांची विजयी परेड काढण्यात आली. आता ही परेड पाहून किंग खानही आपला आनंद लपवू शकला नाहीये. शाहरुखने टीम इंडियासाठी खास पोस्ट केली आहे.

शाहरुखचं ट्वीट

शाहरुखने त्याच्या ट्विटरवर एक ट्वीट केलं आहे. यात त्याने टीम इंडियाचा मरीन येथील एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिलं, 'या सगळ्यांना इतकं आनंदी आणि भावूक पाहून माझं मन अभिमानाने भरून आलं …. भारतीय म्हणून हा एक आश्चर्यकारक क्षण आहे. हे किती भारी आहे. आपल्या भारताची मुलं आम्हाला इतक्या उंचीवर घेऊन जातात हे पाहणं खूप चांगलं आहे!!! माझ्या टीम इंडियावर माझं प्रेम आहे… आणि आता रात्रभर डान्स करा, मजा करा. या निळ्या जर्सीतील मुलांनी कमाल केलीये.. बीसीसीआय, जय शाह आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफचे अभिनंदन ज्यांनी पडद्यामागे अथक परिश्रम घेतले जेणेकरून आमचे खेळाडू उंच भरारी घेऊ शकतील!'

शाहरुखचं हे ट्वीट सध्या खूप व्हायरल झालं आहे. चाहतेही या ट्वीटवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. तर दुसरीकडे ४ जुलैरोजी मुंबईत संपूर्ण टीम इंडियाचं दमदार स्वागत करण्यात आलं. वानखेडे आणि मरीनवर जणू क्रिकेटप्रेमींचा समुद्र उसळला होता. हे सगळं चित्र पाहण्यासारखं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT