Shah Rukh Khan esakal
Premier

Shah Rukh Khan: "तो तर बॉलिवूडचा जावई, मी त्याला तेव्हापासून ओळखतोय, जेव्हा तो.."; किंग खानकडून किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

Shah Rukh Khan: नुकत्याच एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) विराट आणि अनुष्का यांचे कौतुक केलं आहे.

priyanka kulkarni

Shah Rukh Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिचा आज (1 May) वाढदिवस आहे. अनुष्काला सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अनुष्कानं सात वर्षांपूर्वी क्रिकेटर विराट कोहलीसोबत (Virat Kohli) लग्नगाठ बांधली. विराट आणि अनुष्का हे कपल 'पावर कपल' म्हणून ओळखलं जातं. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) विराट आणि अनुष्का यांचे कौतुक केलं आहे. या मुलाखतीमध्ये शाहरुख म्हणाला की, "विराट हा बॉलिवूडचा जावई आहे."

काय म्हणाला शाहरुख खान?

स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खान म्हणाला, "मी विराट कोहलीसोबत खूप वेळ घालवला आहे, मला तो खूप आवडतो. तो आमच्या क्षेत्राचा (बॉलिवूडचा) जावई आहे. इतर खेळाडूंच्या तुलनेत मी त्याला सर्वात जास्त ओळखतो. मी विराट आणि अनुष्काला खूप दिवसांपासून ओळखतो. मी त्यांच्यासोबत खूप वेळ घालवला आहे. मी त्याला तेव्हापासून ओळखतो जेव्हा तो अनुष्काला डेट करत होता. मी अनुष्कासोबत चित्रपटाचे शूटिंग करत होतो. त्यावेळी विराटनं आमच्यासोबत बरेच दिवस घालवले. तेव्हा आमच्या मैत्री झाली."

शाहरुखनं विराटला शिकवला डान्स

काही दिवसांपूर्वी विराट आणि शाहरुख यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये विराट आणि शाहरुख हे पठाण चित्रपटातील झूमे जो पठाण या गाण्याची हूक स्टेप करताना दिसले. याबद्दल शाहरुख म्हणाला, "मी त्याला पठाण चित्रपटातील गाण्याची स्टेप्स शिकवली. मी त्याला एका सामन्यात पाहिले होते,तो रवींद्र जडेजासोबत डान्स करत होता. ती डान्स स्टेप करण्याचा तो प्रयत्न करत होता."

रब ने बना दी जोडी, जब तक है जान, जब हॅरी मेट सेजल आणि झिरो या चित्रपटांमध्ये शाहरुख आणि अनुष्का यांनी एकत्र काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT