shahrukh khan  sakal
Premier

Anant Radhika Wedding: समोर अमिताभ बच्चन आले अन् शाहरुखने... अनंत- राधिकाच्या लग्नात किंग खानच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं

Shah Rukh Khan At Anant Ambani Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातील अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. त्यातील शाहरुखच्या त्या कृतीने सगळ्यांची मनं जिंकली आहेत.

Payal Naik

रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि नीता अंबानी अंबानी यांच्या मुलाचा शाही विवाहसोहळा १२ जुलै रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. अनंत अंबानी राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकला. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे हा विवाह पार पडला, त्यांच्या लग्नसोहळ्याला बॉलिवूमधील अनेक दिग्गज कलाकार हजर होते. ग्रँड पद्धतीने हा विवाह पार पडला. या विवाहाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातील किंग खानचा एक व्हिडिओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. बॉलिवूडचा बादशाह असलेल्या शाहरुखने या व्हिडिओमधून सगळ्यांची मनं जिंकली आहेत.

शाहरुख त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या वागणुकीसाठीही चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. त्याच्यावरच्या संस्कारांचं कायमच कौतुक होताना दिसतं. आताही त्याने असंच काहीतरी केलं आहे. सगळ्यांसमोर मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यास, त्यांच्यासमोर झुकण्यात त्याला कसलाही कमीपणा वाटत नाही हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. शाहरुखचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात तो महानायक अमिताभ बच्चन यांचे आशीर्वाद घेताना दिसतोय. या व्हिडिओत अमिताभ आणि जया बच्चन उभ्या असलेल्या ठिकाणी शाहरुख स्वतःहून जातो आणि बिग बींच्या पाया पडतो. त्यांच्या पाठोपाठ तो जया यांच्याही पाया पडून आशीर्वाद घेतो.

त्यापूर्वी तिथे बसलेल्या रजनीकांत आणि त्यांच्या पत्नीकडे शाहरुख स्वतःहून जातो आणि त्यांना हात जोडून नमसकार करतो. सचिन तेंडुलकर यालाही हात जोडून नमस्कार करतो. त्याच्या या कृतीचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहेत. नेटकरी त्याच्यावर फिदा झाले आहेत. शाहरुखच्या या सवयींमुळेच तो बॉलिवूडचा किंग खान आहे असं म्हणत चाहते त्याच्या वागण्याचं कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: मोदी सरकारमधील कोणत्या मंत्र्याने सर्वात वाईट कामगिरी केली? ५ मंत्र्यांची यादी तयार; खुद्द पंतप्रधानांनीच घेतली बैठक

शुभमन गिलचा IPL 2026 मधील बेस्ट कॅच... शिवम दुबेला माघारी पाठवून फिरवली मॅच Video Viral

Latest Marathi News Live Update : फोंडा घाटातून वाहतुकीवरील निर्बंध दहा जूनपर्यंत कायम

आधी घर आणि आता अलिशान गाडी! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याने खरेदी केली नवी कोरी कार, किंमत ऐकून थक्क व्हाल

Solapur OBC Hostel News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! वसतिगृह प्रवेश नियमित, ५१०० रुपये निर्वाह भत्ता मंजूर, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

SCROLL FOR NEXT