Shahid Kapoor And Mira Rajput SAKAL
Premier

Shahid Kapoor And Mira Rajput: शाहिद अन् मिरानं वरळीत घेतलं आलिशान घर; किंमत माहितीये?

Shahid Kapoor New House: शाहिद आणि त्याची पत्नी मिरा कपूर (Mira Rajput) यांनी नुकतेच मुंबईत आलिशान घर घेतलं आहे.

priyanka kulkarni

Shahid Kapoor And Mira Rajput: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा नेहमीच त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. शाहिद हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. पण सध्या शाहिद हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. शाहिद आणि त्याची पत्नी मिरा कपूर (Mira Rajput) यांनी नुकतेच मुंबईत आलिशान घर घेतलं आहे. जाणून घेऊयात शाहिदच्या या आलिशान घराबद्दल आणि या घराच्या किमतीबाबत...

शाहिद आणि मिराच्या नव्या घराची किंमत किती?

शाहिद आणि त्याची पत्नी मिरा कपूर यांनी मुंबईतील वरळी या भागात आलिशान घर घेतलं आहे. IndexTap.com नुसार, शाहिद कपूर आणि पत्नी मिरा कपूर यांनी मुंबईतील वरळी भागातील ओबेरॉय 360 वेस्ट प्रोजेक्टमध्ये 58.66 कोटी किमतीचे घर घेतलं आहे.

शाहिदचं हे नलं लक्झरी अपार्टमेंट 5,395 चौरस फूट RERA कार्पेटचे आहे आणि यामध्ये शाहिदला तीन पार्किंग स्पेस देखील मिळणार आहे. रिपोर्टनुसार,शाहिद कपूरनं या घराचे 1.75 कोटी मुद्रांक शुल्क भरले आहे.

2018 मध्ये, शाहिद कपूरने याच इमारतीत 8,281 चौरस फूट आकाराचे एक अपार्टमेंट 55.60 कोटींना खरेदी केले होते, त्यानं या अपार्टमेंटचे 2.91 कोटी मुद्रांक शुल्क भरले होते.

शाहिद कपूरचे चित्रपट

शाहिदचा तेरी बातों में ऐसा उलझा जिया हा चित्रपट फेब्रुवारी या महिन्यात रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शाहिद लवकरच देवा आणि फर्जी-2 या दोन प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देवा या चित्रपटात शाहिद हा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात पूजा हेगडे देखील महत्वाची भूमिका साकारणार आहे. शाहिदच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT