Shahid Kapoor's daughter Esakal
Premier

VIDEO : शाहिदच्या लेकीने आईसाठी बनवला खास पदार्थ, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Shahid Kapoor's daughter made special dish for her mother : अभिनेता शाहिद कपूरच्या लेकीने तिच्या आईसाठी खास पदार्थ बनवला.

सकाळ डिजिटल टीम

Shahid Kapoor : अभिनेता शाहिद कपूर त्याच्या अभिनय आणि सिनेमाबरोबरच त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतो. सोशल मीडियावर त्याचे त्याच्या कुटूंबाबरोबरचे व्हिडीओज चर्चेत असतात.

नुकतंच शाहिदच्या पत्नीने मीराने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

मीराची पोस्ट

शाहिदची पत्नी मीराने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये टेबलवर वेगवेगळे पदार्थ मांडलेले दिसत असून तिची आणि शाहिदची लेक मिशा सगळ्यांना कोणत्या टेबलवर बसायचं याची ऑर्डर देत असल्याचा आवाज येतोय.

सोबत लिहिलेली कॅप्शनमध्ये मीराने म्हंटलं कि,"आईने बनवलेलं जेवण आणि मिशाने बनवलेला गोड पदार्थ ! मी खूप भाग्यवान आहे.

आईने बनवलेली पॅड थाई आणि थाई करी सोबत असलेला जस्मिन भात. माझ्या लाडक्या लेकीने बनवलेला ऑरेंज केक, अँपल पाय आणि टुटी फ्रुटी अप्रतिम होती. "

मुलांना ठेवलंय सोशल मीडियापासून दूर

शाहिद आणि मीराला मिशा आणि झैन ही दोन मुलं आहेत. दोघही धीरूभाई इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिकतात. मिशा आता आठ वर्षांची असून झैन आता पाच वर्षांचा आहे. सोशल मीडिया आणि पापाराझींपासून शाहिदने त्याच्या मुलांना लांब ठेवलं आहे. ते दोघेही फार कमी वेळा मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.

शाहिद आणि मीराने २०१५ मध्ये लग्न केलं. त्यांचं अरेंज मॅरेज असून एका कार्यक्रमात त्यांच्या कुटुबांची ओळख झाली होती मग त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. मीरा आणि शाहिदमध्ये १३ वर्षांचं अंतर आहे.

शाहिदचे आगामी प्रोजेक्ट्स

शाहिदचा ''तेरी बातो में ऐसा उलझा जिया' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. कृती सॅनॉनबरोबर त्याने या सिनेमात काम केलं होतं. त्याचा हा सिनेमा खूप गाजला. त्यानंतर त्याचा आता देवा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. यात तो एका पोलीस ऑफिसरची भूमिका साकारणार आहे जो एका गुन्ह्याचा तपास करत असतो ज्याने तो संकटात सापडतो. ११ ऑक्टोबर २०२४ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT