Shahrukh  Esakal
Premier

Mufasa Movie : आर्यन, सुहाना पाठोपाठ अबरामचंही सिनेविश्वात पदार्पण , मुफासा सिनेमासाठी करणार भाऊ-वडिलांबरोबर काम

Abram Khan debut in Mufasa movie with Shah Rukh Khan : अभिनेता शाहरुख खानचा धाकटा लेकही त्याच्या दोन्ही मुलांपाठोपाठ सिनेविश्वात पदार्पण करतोय.

सकाळ डिजिटल टीम

शाहरुख खान आणि त्याची दोन्ही मुलं आर्यन खान आणि अबराम खान पहिल्यांदाच मुफासा सिनेमाच्या निमित्ताने एकत्र काम करत आहेत. या सिनेमातून शाहरुखचा धाकटा लेक अबराम सिनेविश्वात पदार्पण करतोय. मुफासा या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनसाठी अबराम त्याचे वडील शाहरुख आणि मोठा भाऊ आर्यन बरोबर हिंदी मध्ये डब करतो आहे. शाहरुख या सिनेमात मुफासाच्या वयस्कर रुपाला आवाज देणार आहे तर आर्यन सिम्बा या भूमिकेला आवाज देणार आहे तर अबराम लहान मुफासाला आवाज देणार आहे. शाहरुख खान आणि आर्यनने या आधी लायन किंग या २ ० १ ९ साली रिलीज झालेल्या सिनेमासाठी डबिंग केलं होतं.

मुफासा सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. ट्रेलरमधील अबरामचा वाचिक अभिनय पाहून अनेकजण त्याच्या प्रेमात पडले आहेत. तर शाहरुखने मुफासाचा विनोदी अंदाजही या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

पहा ट्रेलर :

या सिनेमाबद्दल बोलताना शाहरुखने एका मुलाखतीमध्ये सांगितलं कि,"मुफासाला एक अतुलनीय वारसा आहे आणि तो जंगलाचा राजा म्हणून उभा आहे, त्याचा मुलगा सिम्बाला तो त्याच्याजवळ असलेलं ज्ञान देतो. एक वडील म्हणून मी या पात्रांशी जोडला गेलो आहे. चित्रपटातील मुफासाच्या प्रवासही मला जवळचा वाटतो. 'मुफासा: द लायन किंग', मुफासाचे बालपणापासून ते एक अविश्वसनीय राजा म्हणून उदयापर्यंतचे जीवन चित्रित करते आणि या पात्राची पुनरावृत्ती करणे अपवादात्मक आहे. डिस्नेसोबत माझ्यासाठी हे विशेष सहकार्य आहे, विशेषत: माझी मुले, आर्यन आणि अबराम या प्रवासाचा भाग आहेत आणि त्यांच्यासोबत हा अनुभव शेअर करणे खरोखर अर्थपूर्ण आहे."

या ट्रेलरमध्ये मुफासाचे मित्र सिम्बाला त्याच्या वडिलांच्या बालपणीची गोष्ट सांगताना दिसत आहेत. मुफासा आणि राजकुमार स्कारची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळेल. एक अनाथ मुलगा जंगलाचा राजा कसा बनला याची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. मुफासा द लायन किंग हा सिनेमा २ ० डिसेंबर २ ० २ ४ ला रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

SCROLL FOR NEXT