Shakira And Taylor Swift  Esakal
Premier

Shakira: 'या' जगप्रसिद्ध पॉपस्टार बरोबर काम करण्याची शकीराची इच्छा

Taylor Swift: यानंतर दोन्ही गायिकांच्या चाहत्यांनी सोशल मीडिया डोक्यावर घेतले आहे. जर या जोडीने एकत्र काम केले तर ते हीट ठरेल यात शंका नाही, असे चाहते म्हणत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Shakira And Taylor Swift Collaboration:

जगप्रसिद्ध गायिका शकीरा तब्बल सात वर्षांनंतर "लास मुजेरेस या नो लोरन" या अल्बमद्वारे संगीत विश्वात पुनरागमन करत आहे.

दरम्यान, या अल्बमच्या प्रमोशनसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात, शकीराला तिला भविष्यात कोणासोबत काम करायला आवडेल याबाबत विचारण्यात आले होते. यावर क्षणाचाही विलंब शकीराने टेलर स्विफचे नाव घेत तिच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शकीराला विचारण्यात आले की, तुला भविष्यात कोणत्या कलाकाराबरोबर काम करायला आवडेल. त्यावर शकीरा म्हणाली टेलर स्विफ्टबरोबर काम करणे 'लक्झरी' असेल.

यानंतर दोन्ही गायिकांच्या चाहत्यांनी सोशल मीडिया डोक्यावर घेतले आहे. जर या जोडीने एकत्र काम केले तर ते हीट ठरेल यात शंका नाही, असे चाहते म्हणत आहेत.

शकीराचा अल्बम, "लास मुजेरेस या नो लोरन," मध्ये तिचे वैयक्तिक अनुभव सांगणारी गाणी आहेत, ज्यात गेरार्ड पिकेसोबतचे तिचे ब्रेकअपचा देखील समावेश आहे.

हा अल्बम 22 मार्च रोजी रिलीज झाला असून, सध्या याला चाहत्यांची मोठी पसंत मिळत आहे.

शकीराने नुकतेच म्हटले होते की, तिच्या गेल्या काही वर्षांतील दु:खाला दूर सारून तिने हा अल्बम थेरपीचे म्हणून तयार केला आहे.

टेलर स्विफ्ट ही शकीराची मोठी फॅन असल्याचे वेळोवेळी दिसले आहे. गेल्या वर्षीच्या VMA व्हिडिओ म्युझिक अवॉर्ड्सदरम्यान शकीरा स्टेजवर परफॉर्म करत असताना टेलर स्विफ्ट प्रेक्षकांमध्ये नाचताना दिसत होती.

दरम्यान, शकीरालाही टेलरचे हे नृत्य इतके आवडले की तिने त्याची एक क्लिप तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केली. आणि टेलरला इतका चांगला वेळ घालवताना पाहणे ही 'खरी ट्रीट' असल्याचे म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT