Zeenat Aman Mukesh khanna 
Premier

'जरा विचार करुन...'; झीनत अमान यांच्या लिव्ह-इन-रिलेशनशिपच्या सल्ल्यावर भडकला 'शक्तिमान'!

Zeenat Aman live in relationship advice: शिवाय झीनत या आपल्या वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. त्यांनी अनेकदा धाडसी वक्तव्ये केली आहेत.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान यांचा चाहतावर्ग मोठा आहे. शिवाय झीनत या आपल्या वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. त्यांनी अनेकदा धाडसी वक्तव्ये केली आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी लिव्ह-इन-रिलेशनशिपबाबत एक सल्ला दिला होता. त्यांच्या या सल्ल्यावरुन बॉलिवूडमध्ये दोन गट पडले आहेत. काहींनी त्यांचं समर्थन केलंय, तर काहींनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतलीये.

शक्तिमान आणि महाभारत मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांनी झीनत अमान यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी झीनत यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी 'दैनिक जागरण'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की, झीनत या सुरुवातीपासूनच वेस्टर्न कल्चरनुसार जगल्या आहेत. त्यामुळे त्या असा सल्ला देत आहेत. (Shaktiman mukesh khanna flares up over Zeenat Aman live in relationship advice bollywood news)

खन्ना पुढे म्हणाले की, 'आपल्या संस्कृती आणि इतिहासामध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिपला मान्यता नाही. हे पश्चिमी संस्कृतीतून आलं आहे. झीनत अमान यांनी पश्चिम संस्कृतीनुसार आपलं जीवन जगलं आहे. त्यामुळे त्यांना तसं वाटत असावं. एक मुलगा आणि मुलगी लग्नाशिवाय पती-पत्नी म्हणून एकत्र राहणे मान्य करण्यासारखं नाही. त्यामुळे असं वक्तव्य करणाऱ्यांनी जरा विचार करुन बोलायला हवं.'

मुकेश खन्ना यांनी लिव्ह-इन-रिलेशनशिपमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबतही चिंता व्यक्त केली. मुलगा आणि मुलगी लग्न न करता एकमेकांसोबत राहायला लागले तर त्यांचं पुढे काय होईल. त्यांच्यात पुढे बिनसलं तर काय होणार, असा सवाल त्यांनी केला आहे. (Zeenat Aman vs Mukesh khanna)

झीनत अमान यांनी एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी लिव्ह-इन-रिलेशनशिपचे समर्थन केले होते. त्याचं म्हणणं होतं की, लग्नाआधी मुलगा-मुलीने एकत्र राहावे. त्याचं हे मत अनेकांना रुचलं नाही. दिग्गज अभिनेत्री मुमताज यांना झीनत यांचा सल्ला पटला नाही. त्यामुळे त्यांनी याचा विरोध केला होता. दरम्यान, झीनत यांच्या वक्तव्यावरुन अजूनही गदारोळ सुरुच आहे. (Entertainment News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: हवेलीतील ४६ अधिकारी दोषी! पुण्यातील जमीन मोजणी गैरव्यवहार प्रकरण, कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबविण्यात येणार..

IPL 2026 मध्ये 'इम्पॅक्ट खेळाडू' चा नियम राहणार की नाही? रोहित, विराट, अक्षर यांच्या विरोधानंतर BCCI अ‍ॅक्शन मोडवर; बैठकीत बरंच काही घडलं

Dr. Jaysingrao Pawar Passes Away: छत्रपतींचा इतिहास उजळवणारा संशोधक हरपला; डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या पुरातन काळाराम मंदिरात रामनवमीचा मोठा उत्साह; मंदिराला फुलांची आकर्षक सजावट

Road Project Scam: राज्यातील रस्ते कामांत २९७ कोटींचा अनावश्‍यक खर्च;‘कॅग’चे राज्य सरकारवर ताशेरे, गंभीर त्रुटी अन् विधानसभेत काय घडलं!

SCROLL FOR NEXT