Sharmila Shinde SAKAL
Premier

Sharmila Shinde: "कलाकार अजून जिवंत आहेत..."; मालिकेत AIच्या वापरामुळे भडकली अभिनेत्री

Artificial intelligence: मालिका आणि चित्रपटांमध्ये AI चा वापर होण्याबाबत एका अभिनेत्रीनं पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Sharmila Shinde: AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर सध्या विविध क्षेत्रात होत आहे. अशातच मनोरंजन विश्वात देखील AI चा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी ‘तू भेटशी नव्याने’  या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रोमोमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करण्यात आला होता. या प्रोमोचं अनेकांनी कौतुक केलं. पण आता मालिका आणि चित्रपटांमध्ये AI चा वापर होण्याबाबत एका अभिनेत्रीनं पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

शर्मिला शिंदेची पोस्ट

अभिनेत्री शर्मिला शिंदेनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं,"कृपया AI चा वापर टाळा आणि हाडा मासाचे कलाकार कास्ट करा. AI ला फार प्रोत्साहन देऊ नका. कास्टिंग करणाऱ्यांनी थोडे कष्ट घेतले तर एक सारखे दिसणारे कलाकार सापडतील. मी स्वरगंधर्व सुधीर फडके हा सिनेमा बघितला नाहीये पण कौतुक ऐकलंय की बाबूजींच्या सिनेमामधल्या भूतकाळ आणि वर्तमानातल्या भूमिकांसाठी सुर्वे आणि आदिश वैद्य यांचं कास्टिंग अगदी चपखल बसलंय."

"एखाद्या पात्राच तारुण्य किंवा वृद्धावस्था दाखवायला AI कशाला हवय. कला आणि कलाकार अजून जिवंत आहेत. काही विशेष किंवा अपरिहार्य परिस्थितिंमध्ये गर्जेपुर्ता आणि मर्यादित वापर हा तंत्रज्ञानाचा योग्य वापर म्हणून समजला जाऊ शकतो.", असंही शर्मिलानं पोस्टमध्ये लिहिलं.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे शर्मिला शिंदेला विशेष लोकप्रियता मिळाली. सध्या शर्मिला ही नवी मिळे हिटरला या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील शर्मिलाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT