munjya movie collection eSakal
Premier

Munjya Box Office: कोकणातल्या 'मुंज्या'ने गाजवलं बॉक्स ऑफिस; वीक डेलाही चित्रपटाची बक्कळ कमाई; वाचा एकूण कलेक्शन

Munjya Movie Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'मुंज्या' चित्रपटाने पाचव्या दिवशीही चांगली कमाई केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रदर्शनाच्या काही दिवसातच यावर्षीच्या हिट चित्रपटाच्या यादीत आलेला अभय वर्मा, शर्वरी वाघ यांचा 'मुंज्या' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय. या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. पहिल्या चार दिवसातच या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. कोकणातल्या दंतकथेतील मुंज्यावर आधारलेला हा चित्रपट आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसतोय. पहिल्या चार दिवसात या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. आता चित्रपटाच्या पाचव्या दिवसाचं कलेक्शन समोर आलं आहे. वाचा या चित्रपटाची एकूण कमाई.

'मुंज्या' हा चित्रपट ७ जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. त्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ४ कोटी २१ लाखांची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ७ कोटी ४० लाखांचा व्यवसाय केला. तर रविवारी या चित्रपटाने ८. ४३ कोटींची कमाई केली. तर सोमवारी सुट्टीचा दिवस नसतानाही प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. सोमवारी चित्रपटाने ३ कोटी ७५ लाखांची कमाई केली. आता या चित्रपटाची पाचव्या दिवशीची कमाई समोर आली आहे. मंगळवारीही या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाने पाचव्या दिवशी जवळपास ४ कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने २७ कोटी २५ लाखांची कमाई केल्याचं सांगण्यात येतंय. सॅकनिक या वेबसाइटने ही माहिती दिली आहे.

हा चित्रपट कोकणात चित्रित करण्यात आला आहे. या चित्रपटात कोणताही बडा कलाकार नसताना चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतोय. या चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंह यांच्याबरोबरच सुहास जोशी, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे हे कलाकार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT