sharvari wagh  sakal
Premier

Sharvari Wagh: 'मी लोभी अभिनेत्री...', 'मुंज्या', 'महाराज'च्या यशानंतर शर्वरी वाघचं वक्तव्य चर्चेत; म्हणते-

Sharvari Wagh Movies: नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ‘सरप्राईज फॅक्टर’ म्हणून स्विकारायला मला आनंद होईल!’ असं ती म्हणाली आहे.

Payal Naik

Sharvari Wagh In Maharaj: एखाद्या चित्रपट लोकप्रिय किंवा हिट ठरला की त्या चित्रपटातील कलाकारांना आणखी काम करण्यासाठी वाव मिळतो. अभिनेत्री शर्वरी वाघच्या बाबतीतही असच झालंय. तिने 'बंटी और बबली २' या चित्रपटातून सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं होतं. मात्र त्यानंतर तिला एवढी लोकप्रियता मिळाली नाही. पण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या दोन चित्रपटांमधून शर्वरी लक्ष वेधून घेतेय. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' या चित्रपटातही शर्वरीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

'मुंज्या' हा आता ब्लॉकबस्टर चित्रपट ठरलाय. त्यामुळे शर्वरीदेखील तिच्या कामामुळे प्रकाशझोतात आलीय. यासोबतच या चित्रपटातील 'तरस' या गाण्यातील तिच्या नृत्यकौशल्यानेही तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. शिवाय ओटीटीवर आलेल्या 'महाराज' या चित्रपटातील तिच्या कामाचंही कौतुक होतंय. त्यामुळे शर्वरी सध्या सरप्राईज फॅक्टर ठरली असल्याचं बोललं जातंय. 'महाराज' मधील तिचं काम समीक्षक आणि प्रेक्षकांकडून पसंत केलं जातंय. याबद्दल शर्वरीने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.

शर्वरी म्हणते की, "लोकं मला 'महाराज'चा मोठा सरप्राईज फॅक्टर म्हणत आहेत हे वाचून मला खूप आनंद होत आहे. एक अभिनेत्री म्हणून मला प्रत्येक भूमिकेत आणि प्रत्येक चित्रपटात प्रभाव पाडायचा आहे. म्हणूनच मी सरप्राईज फॅक्टर म्हणून होणारं कौतुक नम्रपणे आणि आनंदाने स्वीकारेन. मी नेहमीच उत्तम काम करण्याचा प्रयत्न करते कारण मी माझ्या प्रत्येक चित्रपटाला काहीतरी मोठ्या आणि चांगल्या गोष्टीसाठी असलेलं एक पाऊल समजते. माझ्यासाठी हा महिना व्यावसायिकदृष्ट्या खूप छान होता. माझ्या कारकिर्दीतील दुसरा चित्रपट 'मुंज्या'मध्ये मला एक मोठा ब्लॉकबस्टर मिळाल्याचा अनुभव खूपच अद्भुत आहे.

शर्वरी पुढे म्हणाली, 'शिवाय 'महाराज'साठी मला मिळणारे प्रेमदेखील एक अविश्वसनीय अनुभव आहे. कोणत्याही चित्रपटात सरप्राईज फॅक्टर म्हणून ओळखले जाणे ही खूप मोठी प्रशंसा आहे. मी एक खूपच लोभी अभिनेत्री आहे. मी नेहमी प्रत्येक पात्रासह काहीतरी वेगळे आणण्यासाठी खूप मेहनत करते आणि त्यानंतर कौतुक होणं हे माझ्यासाठी खूपच फायद्याचे आहे. हे मला अधिक मेहनत करायला आणि प्रत्येक वेळी पडद्यावर चांगली कामगिरी करण्यास मदत करते.”

आगामी काळात शर्वरी ही 'वेदा' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शिन निखिल अडवाणी करत असून शर्वरी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. शिवाय यशराज फिल्म्सच्या बहुप्रतीक्षित स्पाय युनिव्हर्समध्येही ती दिसणार आहे. या चित्रपटात आलिया भट देखील मुख्य भूमिकेत दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: अनपेक्षित... भारतीय संघात एक बदल; विजयी संघात बदल करण्याची वेळ का आली? शुभमन गिल म्हणाला...

भारतातून OnePlus ची एक्झिट? 2027 पर्यंत कंपनी बंद होणार असल्याची चर्चा; ज्यांच्याकडे आत्ता मोबाईल आहे त्यांनी काय करायचं? वाचा

Latest Marathi News Live Update : वेस्टर्न एक्सप्रेस-वेवर अपघात, पाच कार अन् एक बसची एकमेकांना धडक, प्रवाशी किरकोळ जखमी

Varandha Ghat Landslide Risk: वरंधा घाटात दरडींचा धोका कायम; रस्त्याशेजारील मातीचे ढिगारे तातडीने हटवण्याची मागणी

Tukaram Munde news: मुंढेंचा दणका, अकोल्यात गुटख्याचा कारखाना उद्धवस्त..50 लाखांचा माल जप्त..

SCROLL FOR NEXT